भारती सिंहने पांडा, गेंडी म्हणणाऱ्या ट्रोलर्सला सुनावले खडेबोल

Bharti Singh Troll | कॉमेडी क्वीन भारती सिंहने ट्रोलिंगबाबत भाष्य केले आहे. सोशल मीडियावर अनेक कलाकारांना सातत्याने ट्रोल केले जाते. भारतीला देखील अनेकदा तिच्या दिसण्यावरून ट्रोल केले जाते. नुकतेच भारतीने तिच्या एका व्लॉगमध्ये ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे. सुरुवातीच्या काळात अनेकांनी भारतीला तिच्या वाढलेल्या वजनावरुन ट्रोल केलं आहे. यानंतर आता तिने तिचे वजनही कमी केले आहे. यामुळे देखील ती चर्चेत राहिली आहे.
भारती म्हणते की, “मी कधीही कोणता फोटो शेअर केला की लोक त्यावर अत्यंत वाईट कमेंट करतात. कोणी पांडा, गेंडी असं काहीही म्हणतात. पण, मला पांडा आणि गेंडी दोन्ही खूप आवडतात. लोक माझ्याबद्दल काय विचार करतात आणि मला काय बोलतात याचा मला काहीच फरक पडत नाही. जे आपल्या स्वत: च्या आयुष्यात काहीच करू शकत नाहीत ते चुकीच्या गोष्टी बोलतात.”
पुढे ती म्हणते, “मी अशा कमेंटकडे लक्षही देत नाही. मी त्या लोकांची मानसिकता समजू शकते जे अशा कमेंट करतात. कारण, ते लोक लोखंडवालामध्ये जाण्याइतके सक्षम नाहीत आणि आम्ही कुठेही जाऊ शकतो. ते आयुष्यात काहीच करु शकत नाही. म्हणून ते कमेंटच्या माध्यमातून आपली भडास काढत असतात,” असं आरती म्हणाली. Bharti Singh Troll |
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, भारती आज देशातील सर्वात जास्त आवडती कॉमेडियन आहे. भारतीने आपला प्रवास स्टँड-अप कॉमेडीने सुरू केला आणि तिच्या बालकलाकार ‘लल्ली’ने प्रसिद्धी मिळवली. तिने केवळ कॉमेडी शोवरच राज्य केले नाही तर एक यशस्वी होस्ट म्हणून स्वतःचे नाव कमावले आहे. Bharti Singh Troll |
दरम्यान, भारती कॉमेडी सर्कस, झलक दिखला जा, नच बलिए, खतरा खतरा खतरा, अशा अनेक रिअॅलिटी शोमध्ये झळकली आहे. सध्या ती ‘लाफ्टर शेफ्स-अनलिमिटेड एंटरटेनमेंट’ या कार्यक्रमात दिसून येत आहे.
हेही वाचा:
अक्षय कुमारच्या चाहत्यांना मोठा धक्का…! ‘वेलकम टू द जंगल’ रिलीज डेट लांबणीवर..





