शरद पवारांचे धाकटे बंधू प्रतापराव पवार यांच्या पत्नीचे निधन; पवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर

पुणे – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे धाकटे बंधू उद्योगपती प्रतापवराव पवार यांच्या पत्नी भारती पवार याचे पुण्यात निधन झाले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. शरद पवार आणि प्रतापराव पवार हे सख्खे बंधू आहेत. भारती पवार यांच्या निधनाने पवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
भारती पवार या गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. त्या जवळपास दीड वर्षांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली.
सुप्रिया सुळे यांची पोस्ट –
अतिशय दुःखी अंतःकरणाने कळविते की, माझ्या काकी भारती प्रतापराव पवार यांचे थोड्या वेळापूर्वी निधन झाले. ही आम्हा सर्वांसाठी अतिशय दुःखद घटना आहे. याक्षणी काकींच्या असंख्य आठवणींनी मनात घर केले आहे. त्या माझ्यासाठी आईसमान होत्या. त्यांनी आम्हा सर्व भावंडांवर सदैव खुप प्रेम केले. आम्हा सर्व भावंडांना त्यांनी दिलेली प्रेमळ साथ सदैव लक्षात राहील.काकी, भावपूर्ण श्रद्धांजली.
अतिशय दुःखी अंतःकरणाने कळविते की, माझ्या काकी सौ भारती प्रतापराव पवार यांचे थोड्या वेळापूर्वी निधन झाले. ही आम्हा सर्वांसाठी अतिशय दुःखद घटना आहे. याक्षणी काकींच्या असंख्य आठवणींनी मनात घर केले आहे. त्या माझ्यासाठी आईसमान होत्या. त्यांनी आम्हा सर्व भावंडांवर सदैव खुप प्रेम केले.… pic.twitter.com/6n9G34MCdW
— Supriya Sule (@supriya_sule) March 17, 2025





