Bhargavi Chirmule: भार्गवी चिरमुलेचे ६ वर्षांनंतर स्टार प्रवाहवर कमबॅक; नव्या भूमिकेत दिसणार
Bhargavi Chirmule: 'मराठी मिडियम' असे भार्गवीच्या नव्या मालिकेचे नाव

Bhargavi Chirmule: अभिनेत्री भार्गवी चिरमुले ६ वर्षांनंतर स्टार प्रवाहवर कमबॅक करणार आहे. यात ती निगेटिव्ह भूमिका साकारणार आहे. विशाखा शुक्रे असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. एका वेगळ्या भूमिकेत ती या मालिकेत पाहायला मिळणार आहे. ‘मराठी मिडियम’ असे तिच्या नव्या मालिकेचे नाव आहे.
विशाखा या तिच्या भूमिकेबद्दल बोलायचे झाले तर, एका मोठ्या बिझनेस फॅमिलीमधून विशाखा आलेली आहे. तिचा नवरा चांगला असला तरी कर्तृत्वाच्या बाबतीत कमी पडतो, हे तिने फार पूर्वीच ओळखलं होतं. त्यामुळे आपल्या मुलाने वडिलांसारखं होऊ नये, यासाठी तिने त्याच्या संगोपनात कोणतीही कसर सोडलेली नाही. आपल्या मतांवर ठाम असलेली विशाखा आपल्या आजूबाजूच्या जगाकडे एका वेगळ्याच नजरेने पाहते.
विशाखाला प्रत्येक गोष्ट परफेक्ट हवी असते. ब्रँडेड नसलेल्या गोष्टींबद्दल तिला चीड आहे. अस्वच्छपणा तिला अजिबात सहन होत नाही. जुन्या चालीरीती आणि परंपरांना तिच्या लेखी फारसं महत्त्व नाही. विशाखाला प्रत्येक गोष्ट परफेक्ट हवी असते. ब्रँडेड नसलेल्या गोष्टींबद्दल तिला चीड आहे. अस्वच्छपणा तिला अजिबात सहन होत नाही. जेरदेशी ते चांगलं, यावर तिचा विश्वास आहे. त्यामुळे जुन्या चालीरीती आणि परंपरांना तिच्या लेखी फारसं महत्त्व नाही.
भार्गवी चिरमुले म्हणाली की, “स्टार प्रवाहसोबत सहा वर्षांनंतर पुन्हा जोडलं जाणं माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. सहा वर्षांपूर्वी सतीशसरांच्या ‘मोलकरीणबाई’ या प्रोजेक्टमध्ये मी होते. ती मालिका उत्तम पद्धतीनं प्रेक्षकांपर्यंत पोहोचली. त्यानंतर टेलिव्हिजनवर काम करण्याचे योग काही जुळून आले नाहीत. वेगळं काम करत होते आणि त्यामुळे टेलिव्हिजनवर काम करणं जमलं नाही, पण आता सहा वर्षांनी जमलं आहे.”
या भूमिकेबद्दल भार्गवी चिरमुले म्हणाली, “मराठी मिडियमची कथा आणि विशाखा शुक्रे हे पात्र माझ्यासाठी खूप वेगळं आहे. आतापर्यंत मी निगेटिव्ह भूमिका फारशा साकारलेल्या नाहीत. त्यामुळे हे पात्र साकारताना कस लागतो. विशाखाची स्वतःची एक विचारसरणी आहे. प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा तिचा वेगळा दृष्टिकोन आहे. या व्यक्तिरेखेतून माझा एक वेगळा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळेल.’
दरम्यान, मराठी मिडियम ही नवी मालिका १२ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. भार्गवीच्या या नव्या मालिकेविषयी चाहत्यांनाही फार उत्सुकता आहे.
हेही वाचा:





