#BharatBandh: बंदला राहुल गांधींचे समर्थन म्हटले …

कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीची माहिती
नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या कामगारविरोधी आणि जनतेच्या इच्छेविरोधी धोरणांच्या विरोधात 8 जानेवारी रोजी देशभरातील कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीने देशव्यापी संप आणि आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनामध्ये 25 कोटी भारतीय सहभागी होतील असे समितीने स्पष्ट केले आहे.
The Modi-Shah Govt’s anti people, anti labour policies have created catastrophic unemployment & are weakening our PSUs to justify their sale to Modi’s crony capitalist friends.
Today, over 25 crore ??workers have called for #BharatBandh2020 in protest.
I salute them.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 8, 2020
याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत समर्थन केले आहे. त्यांनी ट्विट केले आहे की,’मोदी – शाह सरकार लागू करण्यात आलेली जनविरोधी आणि लेबर विरोधातील धोरणांमुळे आज देशात बेरोजगारी वाढत आहे. याचबरोबरीने भारतातील सार्वजनिक क्षेत्राला कमकुवत केले जात आहे. दरम्यान आज २५ करोड कर्मचार्यांनी जेव्हा भारत बंद आंदोलनाची हाक दिली आहे. तर मी आज त्या सर्व लोकांना सलामी देतो.’ असं म्हणत त्यांनी भारत बंदला समर्थन दिले आहे.





