Indapur News : भारत माता की जय, वंदे मातरम् ! घोषणांचा जयजयकारात तिरंगा पदयात्रा संपन्न

इंदापूर: ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारतीय संरक्षण दलांच्या सन्मानार्थ भिगवन(ता. इंदापूर) पश्चिम मंडल येथे भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. भारत माता की जय, वंदे मातरम् अशा घोषणांचा जयजयकार करत तिरंगा पदयात्रा संपन्न झाली. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्यानंतर भारतीय संरक्षण दलांनी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत जबरदस्त प्रहार करत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले.
यामध्ये विषेशतः भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील अनेक शहरांवर क्षेपणास्र हल्ला करीत अतिरेकी तळ उध्वस्त करून, भारतीय लष्कराने व हवाई दलाने आपले सामर्थ्य जगाला दाखवून दिले आहे. याचा भारतीय म्हणून नक्कीच आपल्याला सर्वांना अभिमान असून, संरक्षण दलांनी दाखवलेले शौर्य व धाडस हे प्रत्येक भारतीयाच्या मनात गर्व निर्माण करणारे आहे. अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून देशप्रेम अधिक घट्ट होते आणि नवीन पिढीला प्रेरणा मिळते.
यावेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य मारुती वनवे, माऊली चवरे, जिल्हा सरचिटणीस आकाश कांबळे, तालुकाध्यक्ष तेजस देवकाते, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पानसरे, अजिंक्य माडगे, प्रदीप वाकसे, कमलेश गांधी, शहराध्यक्ष राजेंद्र जमदाडे, दीनानाथ मारणे, गणेश खडके, आबा थोरात, तानाजी मारकड, नाथा पाटील, ज्ञानेश्वर मारकड, संजय भरणे, प्रवीण सलगर, विशाल पाचंगणे, संजय सकुंडे, दिलीप कुंभार, सचिन वाघ, संदीप खुटाळे, रंजीत धुमाळ, गणेश खोमणे व भिगवण परिसरातील नागरिक उपस्थित होते.





