“भारत गौरव ट्रेन’ लवकरच सुरू करणार
Updated On:

नवी दिल्ली – रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज पर्यटक सर्किट ट्रेन्स संकल्पना आधारित भारत गौरव रेल्वेगाड्या सुरू करण्याची घोषणा केली आहे.
या रेल्वेगाड्या भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि भव्य ऐतिहासिक ठिकाणे भारतातील आणि जगातील पर्यटकांना दाखवण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दृष्टी साकार करण्यास मदत करतील असे पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले.
पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिकांच्या मुख्य क्षमतांचा फायदा पर्यटन सर्किट ओळख पटवण्यासाठी, विकसित करण्यासाठी आणि भारताच्या विशाल पर्यटन क्षमतेचा फायदा करून घेण्यासाठी संकल्पना-आधारित ट्रेन चालवून केला जाईल असे ते म्हणाले.





