Bhandara News : भाजपला मोठा धक्का ! ‘या’ महिला नेत्याचे जिल्हा परिषद सदस्यत्व रद्द

भंडारा : भंडारा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भाजपच्या जिल्हा परिषद सदस्य माहेश्वरी नेवारे यांचं जात वैधता प्रमाणपत्र विभागीय आयुक्तांनी रद्द केलं होतं. या आदेशाविरोधात माहेश्वरी नेवारे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. मात्र, ती याचिका आज फेटाळण्यात आली आहे.
भंडाऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनीही विभागीय आयुक्तांचा निर्णय कायम ठेवत भाजपच्या महिला जिल्हा परिषद सदस्य माहेश्वरी नेवारे यांचं जिल्हा परिषद सदस्यत्व रद्द केले आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या भंडारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीच्या विशेष सभेत त्यांना उपस्थित राहता येणार नाही, असे आदेश भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी माहेश्वरी नेवारे यांना नोटीसद्वारे दिले आहेत. त्यामुळे भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
कोण आहेत माहेश्वरी नेवारे?
साकोली तालुक्यातील किन्ही एकोडी जिल्हा परिषद गावातून त्या अनुसूचित जमातीच्या आरक्षित जागेवर निवडून आल्यात.
त्यांच्याकडच्या गोंडगोवारी या जात प्रमाणपत्रावर जिल्हा परिषद सदस्य म्हणून भाजपच्या तिकिटावर निवडून आल्यात.
माहेश्वरी नेवारे यांचं जात वैधता प्रमाणपत्र 14 जानेवारीला गोंदियाच्या जात पडताळणी समितीनं रद्द केलं होतं.
जात वैधता पडताळणी समितीच्या विरोधात नेवारी यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात याचिका दाखल केली होती. मात्र, त्यात नेवारे यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द करून त्यांचा सदस्यत्व ही रद्द केलं होतं.
या निर्णयाच्या विरोधात नेवारे यांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली मात्र ती आता फेटाळण्यात आली. त्यामुळे भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी नागपूर विभागीय आयुक्तांचा निर्णय कायम ठेवला आहे.





