धक्कादायक ! भंडाऱ्यात साक्षगंधाच्या कार्यक्रमाच्या भाजीत पडली पाल ; 51 जणांना विषबाधा

Bhandara । भंडारा याठिकाणच्या जांभोरा गावातून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. साक्षगंधाच्या कार्यक्रमातील भाजीत पाल पडली होती. अनावधानाने ती भाजी ग्रामस्थांनी खाल्ल्याने तब्बल 51 जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली. यामुळे भंडाऱ्यात एकच खळबळ उडाली आहे.
भाजीमध्ये पाल पडली Bhandara ।
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, “भंडाऱ्याच्या जांभोरा गावातील एका मुलीचा विवाह जुळल्यानं साक्षगंधाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या दरम्यान तयार करण्यात आलेल्या भाजीमध्ये पाल पडली. मात्र याबाबत कल्पना नसल्यानं ती गावकऱ्यांना जेवणात वाढण्यात आली. त्यामुळे ही घटना घडली असल्याचे सांगण्यात येत आहे.
भाजी खाल्ल्यानं 51 ग्रामस्थांना विषबाधा Bhandara ।
दरम्यान, जांभोरा गावात 51 जणांना अन्नातून विषबाधा ही भाजी खाल्ल्यानं 51 ग्रामस्थांना विषबाधा झाल्याची घटना घडली. रात्री अनेकांची प्रकृती अत्यवस्थ असल्यानं दहा ते बारा ग्रामस्थांना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर, उर्वरित नागरिकांवर करडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तर काहींवर जांभोरा येथील उपकेंद्रात उपचार करण्यात येत आहे.





