Sidharth Menon Bhagyashree Limaye Photoshoot: ‘मांजर’च्या प्रमोशनसाठी भाग्यश्री लिमये आणि सिद्धार्थ मेननचा हटके अंदाज; फोटोशूटची सोशल मीडियावर चर्चा
Sidharth Menon Bhagyashree Limaye Photoshoot भाग्यश्री आणि सिद्धार्थच्या या हटके फोटोशूटमुळे ‘मांजर’च्या प्रमोशनला आणखी रंगत आली आहे.

Sidharth Menon Bhagyashree Limaye Photoshoot: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या अनेक नव्या चित्रपटांची चर्चा रंगली आहे. त्यात अभिनेता सिद्धार्थ मेनन, ओंकार भोजने, तेजस राऊत आणि अभिनेत्री भाग्यश्री लिमये यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘मांजर’ या आगामी मराठी चित्रपटाकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. हा चित्रपट येत्या १८ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Sidharth Menon Bhagyashree Limaye photoshoot
चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसा ‘मांजर’चा प्रमोशनल धडाका सुरू झाला आहे. सोशल मीडिया, मुलाखती आणि विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून कलाकार चित्रपटाचं प्रमोशन करत आहेत. याचदरम्यान सिद्धार्थ मेनन आणि भाग्यश्री लिमये यांनी केलेल्या एका खास फोटोशूटची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.

Sidharth Menon Bhagyashree Limaye photoshoot
या फोटोशूटमध्ये दोन्ही कलाकारांचा एकदम वेगळा आणि स्टायलिश अंदाज पाहायला मिळत आहे. भाग्यश्री आणि सिद्धार्थ यांच्या या फोटोशूटमधील केमिस्ट्रीनेही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर झाल्यानंतर त्यावर चाहत्यांकडून प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
भाग्यश्रीचा हटके लूक
या खास फोटोशूटसाठी भाग्यश्री लिमयेने अतिशय ग्लॅमरस लूक केला आहे. तिने लेपर्ड प्रिंटचा वनपीस परिधान केला असून, त्यावर काळ्या रंगाचा बेल्ट कॅरी केला आहे. या लूकमध्ये भाग्यश्रीचा आत्मविश्वास आणि तिची स्टाइल चांगलीच उठून दिसत आहे. साध्या पारंपरिक लूकपेक्षा या फोटोशूटमध्ये भाग्यश्री एका वेगळ्याच अंदाजात दिसत आहे. तिच्या फोटोतील पोझ आणि एक्स्प्रेशन्समुळे संपूर्ण फोटोशूटला ग्लॅमरस टच मिळाला आहे.

Sidharth Menon Bhagyashree Limaye photoshoot
सिद्धार्थ मेननचा रंगीत अंदाज
दुसरीकडे सिद्धार्थ मेनननेही आपल्या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सिद्धार्थने लाल रंगाचा शर्ट आणि हिरव्या रंगाचं जॅकेट परिधान केलं आहे. त्यासोबत त्याने मॅचिंग ट्रान्सपरंट सनग्लासेस घातले आहेत. या लूकमध्ये सिद्धार्थचा अंदाज स्मार्ट आणि डॅशिंग दिसत आहे. त्याच्या हटके स्टाइलमुळे फोटोशूट आणखी आकर्षक झालं आहे.

Sidharth Menon Bhagyashree Limaye photoshoot
दोघांची केमिस्ट्री चर्चेत
फोटोशूटमधील भाग्यश्री आणि सिद्धार्थच्या एकत्रित फोटोंमध्ये त्यांची केमिस्ट्री अगदी नॅचरल आणि कूल दिसत आहे. दोघांनीही कॅमेऱ्यासमोर वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत. त्यांच्या या फोटोशूटमधील सहज अंदाजामुळे चाहत्यांचं लक्ष या जोडीकडे वेधलं गेलं आहे.

Sidharth Menon Bhagyashree Limaye photoshoot
‘मांजर’ हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच त्याची चर्चा सुरू झाली आहे. चित्रपटातील कलाकारांची तगडी स्टारकास्ट, वेगळं कथानक आणि सध्या सुरू असलेलं प्रमोशन यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

Sidharth Menon Bhagyashree Limaye photoshoot
चित्रपटात सिद्धार्थ मेनन, भाग्यश्री लिमये यांच्यासोबत ओंकार भोजने आणि तेजस राऊत यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. त्यामुळे या कलाकारांचा अभिनय मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Sidharth Menon Bhagyashree Limaye photoshoot
दरम्यान, भाग्यश्री आणि सिद्धार्थच्या या हटके फोटोशूटमुळे ‘मांजर’च्या प्रमोशनला आणखी रंगत आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या फोटोंमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाआधीच या जोडीची चर्चा चांगलीच रंगली आहे. आता १८ सप्टेंबरला प्रदर्शित होणारा ‘मांजर’ प्रेक्षकांच्या पसंतीस किती उतरतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.





