Bhagyashree: भाग्यश्रीने लालबागच्या राजाचे घेतले दर्शन ; भक्तिभावात रंगली अभिनेत्री

Bhagyashree: गणेशोत्सवाच्या उत्साहात दरवर्षी लाखो भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गर्दी करतात. या रांगेत आता बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री हिचाही समावेश झाला आहे. शुक्रवारी ती आपल्या मुलासोबत लालबागच्या राजाच्या पांडालमध्ये पोहोचली व गणपती बाप्पाचे दर्शन घेतले.
भाग्यश्रीने आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यात ती आपल्या मुलासोबत भक्तिभावाने दर्शन घेताना दिसते. या व्हिडिओला शंकर महादेवन यांनी गायलेल्या ‘गणपती बाप्पा मोरया’ या गाण्याच पार्श्वसंगीत तिने दिले आहे. व्हिडिओ पाहून तिचे चाहतेही भक्तिभावात न्हाऊन निघाले आहेत.
View this post on Instagram
तिच्या लूकची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा झाली. तिने लाल आणि क्रीम रंगाची सुंदर साडी, गळ्यात सोन्याची चैन, कानात छोटे इयरिंग्स, हातात कंगन, कपाळावर टिकली आणि सिंदूर असा पारंपरिक लूक धारण केला होता. साधेपणातही तिचा आकर्षक आणि पारंपरिक अंदाज सगळ्यांना भावला.
तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या असून “गणपती बप्पा मोरया”, “ओम गण गणपतये नमः” असे संदेश आणि हार्ट इमोजी चाहत्यांनी पाठवले आहेत.
दरवर्षी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक येतात. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत येथे भक्तांची रेलचेल असते.
भाग्यश्रीने तिच्या पोस्टमध्ये गणेशस्तवनाचे सुंदर श्लोकही लिहिले आहेत. यातून तिचा गणेशभक्तीतील ओलावा आणि अध्यात्मिकतेशी असलेला घट्ट संबंध दिसून येतो.




