गोंदियाजवळ ‘भगत की कोठी’ एक्सप्रेस मालगाडीवर आदळली; ५० हून अधिक प्रवासी जखमी

मुंबई : रायपुरकडून नागपुरच्या दिशेने जाणाऱ्या “भगत की कोठी” रेल्वेला गोंदिया शहरालगत अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. यावेळी समोरून जात असलेल्या मालगाडीला ‘भगत की कोठी ट्रेन’ने मागून धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातानंतर या ट्रेनचा एक डब्बा रुळाखाली घसरला. या रेल्वेच्या अपघातात 50 च्या वर लोक किरकोळ जखमी झाल्याचे म्हटले जात आहे. जखमी प्रवाशांवर जिल्हा सामान्य रुग्णालय व तसेच खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान ही घटना आज पहाटे 4 वाजता घडल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात 53 लोक किरकोळ जखमी तर 13 जणांना थोडा मार लागला आहे. मालगाडीला ‘भगत की कोठी’ ट्रेन ने दिली मागून धड़क दिली, तेव्हा ट्रेनचा एक S3 डब्बा रुळाखाली घसरला. अपघातात 53 च्या वर लोक जखमी तर 13 किरकोळ जखमी झाले आहे. एकाच ट्रॅकवर दोन ट्रेन नागपूरच्या दिशेने जात होत्या, ‘भगत की कोठी’ ट्रेनला ग्रीन सिग्नल मिळाल्याने ही गाडी समोर निघाली होती, मात्र याच रुळावर मालगाडी समोर चालत असताना गोंदिया शहराला लागून असलेल्या रेल्वे गेटवर सिग्नल व्यवस्थित न मिळाल्याने भगत कोठी ही ट्रेन मालगाडीला धडकली अशी माहिती आहे.
या ट्रेनमधील 13 जणांना गंभीर दुखापत झाली आहे. मात्र, या भीषण अपघातात एकही मृत्यू झालेला नाही ही दिलासादायक बाब आहे. तर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भारतीय रेल्वेच्या म्हणण्यानुसार, पहाटे 4.30 वाजता री-रेल्मेंटचे काम पूर्ण झाल्यानंतर, ही ट्रेन सकाळी 5.24 वाजता घटनास्थळावरून निघाली आणि 5.44 वाजता गोंदियाला पोहोचली. त्याचवेळी सकाळी 5.45 वाजता अप आणि डाऊन वाहतूक पूर्ववत झाली.





