भामट्यांनी हद्दच केली ! अभिनेत्रीला गिफ्ट मिळाल्याचे सांगत ऑनलाईन पद्धतीने घातला गंडा

मुंबई – देशात दिवसेंदिवस ऑनलाईन फ्रॉडमध्ये वाढ होत आहे. ऑनलाईन फसवणुकीचा फटका आता सेलिब्रेटींना देखील बसताना पाहायला मिळत आहे. नुकतेच प्रसिद्ध टेलिव्हिजन शो ‘भाबीजी घर पर हैं’मध्ये अंगूरी भाभीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शुभांगी अत्रे ऑनलाइन फसवणुकीची बळी ठरली. याप्रकरणी तिने स्वतः सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केल्याचे समोर आले आहे.
शुभांगी म्हणाली, 8 सप्टेंबरला मी एका प्रसिद्ध फॅशन अॅपवरून माझ्यासाठी काही गोष्टी ऑर्डर करत होते. ऑर्डर दिल्यानंतर मला त्यांचा फोन आला. त्यांनी माझा पत्ता सांगितला आणि त्यासोबतच अभिनेत्रीने या आधी केलेल्या खरेदीची माहिती देखील तिला सांगण्यात आली. त्यानंतर तुम्ही प्रीमिअर मेंबर आहेत म्हणून तुम्हाला गिफ्ट देणार आहोत त्याची जीएसटी रक्कम तुम्हाला द्यावी लागेल असे सांगण्यात आले. त्यानंतर अभिनेत्रीने पेमेंट करताच तिच्या खात्यातून आणखी रक्कम वजा झाली.
आपल्यासोबत ऑनलाइन फसवणूक झाल्याचे शुभांगीच्या लक्षात आले आणि तिने लगेच तिचे कार्ड ब्लॉक केले. तसेच हे लोक नवीन लुटण्यासाठी नवीन मार्ग शोधतात. असे म्हणत अभिनेत्रीने ऑनलाईन फ्रॉडबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले,

