Bhabhi ji ghar par hai: “सिनेमागृहात त्याच्यासाठी एक सीट राखून ठेवेल”; पतीच्या आठवणीत अभिनेत्री भावुक
Bhabhi ji ghar par hai: ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेशी 10 वर्षांपेक्षा अधिक काळ शुभांगी जोडली होती.

Bhabhi ji ghar par hai: अभिनेत्री शुभांगी अत्रे ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेमुळे घराघरात पोहचली. यातील तिच्या ‘अंगूरी भाभी’ या भूमिकेला मोठी लोकप्रियता मिळाली. मात्र सध्या ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामूळे चर्चेत आली आहे. पतीपासून वेगळ झाल्यानंतर तिने सिंगल मदर बनत सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या. मात्र पतीच्या निधनानंतरही तिने स्वत:ला सावरत मनोरंजन करणे सुरू ठेवले.
पतीच्या आठवणीत भावुक होत शुभांगीने सांगितले, ‘गेले तीन-चार वर्ष माझ्यासाठी खूप कठीण होते. मी माझ्या वैयक्तिक गोष्टींबद्दल कधीच बोलत नाही. माझे फारसे मित्रमंडळीही नाहीत. माझ्यासाठी माझं घर आणि काम एवढंच महत्वाचं आहे. गेल्या वर्षी पीयूषचं निधन झालं तेव्हा मी कोसळले होते. पण मला विश्वास आहे की पीयूषचा आशीर्वाद माझ्यावर आणि आमच्या लेकीवर कायम आहे.
मला पीयूषच्या चांगल्या आठवणी जपून ठेवायच्या आहेत. आता मी भोपाळला घरी जाईन तेव्हा आईवडिलांसोबत सिनेमा पाहणार आहे. तिथे मी पीयूषसाठीही एक सीट राखून ठेवेल. कारण अभिनेत्रीच्या होण्याच्या माझ्या प्रवासात पीयूषने मला खूप पाठिंबा दिला. त्याच्यासाठी ही जागा राखणे माझ्या वचनाचाच भाग आहे.’ Bhabhi ji ghar par hai:
शुभांगीची मुलगी आता 20 वर्षांची आहे. मुलीबद्दल बोलताना तिने सांगितले, ‘तरुणपणी आई झाल्याचे अनेक फायदे असतात हे आता जाणवतं. आधी मला वाटायचं की मी खूप लवकर आई झाले, पण मी मदरहूड खूप एन्जॉय करते. काम करताना मला अनेकदा दुखापत होते, तेव्हा माझी लेक मला म्हणते, ‘आई, तू अजून लहान आहेस. थोडं सोशल व्हायला हवं.’ नुकतंच तिला अमेरिका शिकायला जावे लागले, तेव्हा तिला माझी काळजी वाटत होती. खरंतर मुली या वरदान असतात.’
‘भाभीजी घर पर है’ या मालिकेशी 10 वर्षांपेक्षा अधिक काळ शुभांगी जोडली होती. मात्र आता शिल्पा शिंदेची यात पुन्हा एन्ट्री झाली आहे. ती याच मालिकेवर आधारित ‘भाभीजी घर पर है: फन ऑन द रन’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. Bhabhi ji ghar par hai:
हेही वाचा:
Pune Accident News :कात्रज घाटात भीषण अपघात! सळ्यांनी भरलेल्या ट्रकची बसला धडक; चालकाचा मृत्यू






