कोल्हापूरकरांनो सावधान ! तुमच्याकडे येणारे पाणी शुद्ध आहे का ?
Updated On:

कोल्हापूर – कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात जलशुद्धीकरण केंद्राकडून दिल्या जाणाऱ्या पिण्याच्या सीलबंद बाटलीतील पाण्यात बेडूक वाढल्याने एकच खळबळ उडाली आहे.
शिवाजी विद्यापीठात विद्यापीठाचे जलशुद्धीकरण केंद्र आहे. या केंद्रातून शिवाजी विद्यापीठातील सर्व विभागाना 20 लिटरच्या कॅन मधून पाणी पुरवठा केला जातो. आज मात्र या सील बंद बाटलीत चक्क जिवंत बेडूक आढळला. ग्रंथालयात दिल्या जाणाऱ्या पाण्याच्या कॅनमध्ये बेडूक आढळल्याने विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकारामुळे शिवाजी विद्यापीठातील बाटलीबंद शुद्ध पाण्यावर प्रश्नचिन्ह उभं राहील असून विद्यापीठात खळबळ उडाली आहे.





