पुणे जिल्हा | पिसर्वेत दहावी, बारावीचा विद्यार्थ्यांचे शुभचिंतन
Updated On:

नायगाव, (वार्ताहर)- पुरंदर तालुक्यातील पिसर्वे येथे डॉ. शंकरराव कोलते विद्यालय व ज्युनिअर कॉलेज दहावी शुभचिंतन व बारावी निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित केला होता.
रयत शिक्षण संस्था सातारा मॅनेजिंग कौन्सिल सदस्य विजय कोलते, राष्ट्रपती पुरस्कार शिक्षक विजेते कुंडलिक मेमाणे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मूळ पिसर्वे गावची परंतु सध्या भांडगाव (ता. दौंड) येथील कन्या ऋतूजा रोहिदास कोलते हिची वैमानिक म्हणून निवड झाल्याबद्दल पिसर्वे गावच्या वतीने विजयराव कोलते, सरपंच रवींद्र कोलते, अरुण कोलते, चंद्रकांत कोलते, याकूब सय्यद यांनी सत्कार केला. यावेळी स्कूल सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण कोलते, संध्या फडतरे यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य आर. आर. पाटील यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन ऋतुजा खुडे यांनी केले. महेश कोलते यांनी आभार मानले.



