Best Web Series 2025: OTT विश्वावर जयदीप अहलावतची मोहोर, अनन्या पांडे ठरली बेस्ट अभिनेत्री

Best Web Series 2025: १५ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या फिल्मफेअर OTT अवॉर्ड्स 2025 मध्ये ओटीटीवरील उत्कृष्ट वेब सीरिज, वेब चित्रपट आणि कलाकारांना सन्मानित करण्यात आले. १ ऑगस्ट २०२४ ते ३१ जुलै २०२५ या कालावधीत प्रदर्शित झालेल्या कंटेंटचा विचार या पुरस्कारांसाठी करण्यात आला.
या सोहळ्यात सर्वाधिक चर्चेत राहिले जयदीप अहलावत. त्यांनी ‘पाताल लोक सीझन 2’ मध्ये साकारलेल्या इन्स्पेक्टर हाथीराम चौधरी या दमदार भूमिकेसाठी बेस्ट अभिनेता (ड्रामा – पुरुष) हा पुरस्कार पटकावला. तर अनन्या पांडे हिने ‘कॉल मी बे’ या वेब सीरिजमधील भूमिकेसाठी बेस्ट अभिनेत्री (कॉमेडी) चा किताब जिंकून सर्वांना आश्चर्यचकित केले.
View this post on Instagram
पाताल लोक 2 चा प्रभाव
वेब सीरिज कॅटेगरीत ब्लॅक वॉरंट ला बेस्ट सीरिज म्हणून गौरवण्यात आले. तर क्रिटिक्स चॉइस बेस्ट सीरिज हा पुरस्कार पाताल लोक सीझन 2 ला मिळाला.
ड्रामा कॅटेगरीत खौफ साठी मोनिका पंवार हिने बेस्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकला. तसेच जहान कपूर आणि रसिका दुग्गल यांच्या अभिनयालाही विशेष दाद मिळाली.
सपोर्टिंग रोल्स आणि कॉमेडी
कॉमेडी कॅटेगरीत ‘रात जवान है’ ही बेस्ट कॉमेडी सीरिज ठरली. या सीरिजसाठी बरुण सोबती यांना बेस्ट अभिनेता (कॉमेडी) पुरस्कार मिळाला, जो त्यांनी दुपहिया साठी स्पर्श श्रीवास्तव यांच्यासोबत संयुक्तपणे शेअर केला. सपोर्टिंग रोल्समध्ये राहुल भट्ट, तिलोत्तमा शोम, विनय पाठक आणि रेणुका शहाणे यांना सन्मानित करण्यात आले.
View this post on Instagram
वेब चित्रपट आणि नवोदित कलाकार
वेब ओरिजिनल चित्रपटांमध्ये ‘गर्ल्स विल बी गर्ल्स’ ला बेस्ट वेब ओरिजिनल फिल्म ठरवण्यात आले. सान्या मल्होत्रा (मिसेस) हिला बेस्ट अभिनेत्री, तर अभिषेक बॅनर्जी (स्टोलन) यांना बेस्ट अभिनेता पुरस्कार मिळाला. क्रिटिक्स कॅटेगरीत विक्रांत मॅसी (सेक्टर 36) यांचा गौरव करण्यात आला.
नवोदित कलाकारांमध्ये ‘ब्लॅक वॉरंट’ मधील अनुराग ठाकूर आणि ‘कॉल मी बे’ मधील लिसा मिश्रा यांनी ब्रेकथ्रू परफॉर्मन्स अवॉर्ड जिंकला. एकूणच, फिल्मफेअर OTT अवॉर्ड्स 2025 मध्ये दमदार अभिनय, चांगल्या कथा आणि नव्या कलाकारांचा ठसा स्पष्टपणे दिसून आला.




