‘या’ टॉप-5 SUV खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी, किंमत कमी अन् फीचर्स जबरदस्त

Best SUV in India: भारतीय बाजारात Sub 4m SUV सेगमेंट सर्वात लोकप्रिय आहेत. भारतीय ग्राहकांकडून या एसयूव्ही खरेदी करायला शोरूममध्ये गर्दी होते. या सेगमेंटमधील Maruti Brezza, Tata Punch आणि Maruti Fronx या लोकप्रिय कार आहेत. या सेगमेंटमधील डिसेंबर 2024 मध्ये सर्वाधिक विक्री झालेल्या टॉप-5 कारविषयी जाणून घेऊया.
Maruti Suzuki Brezza: या कारला डिसेंबर महिन्यात 17,333 ग्राहकांनी खरेदी केली. ही मारुतीची सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक आहे. ब्रेझाची सुरुवाती एक्स-शोरूम किंमत 8.34 लाख रुपये आहे, तर टॉप-स्पेक वेरिएंटसाठी 13.98 लाख रुपये (एक्स-शोरूम) खर्च करावे लागतील. यात सनरूफ, हेड-अप डिस्प्ले, 9-इंच स्मार्टप्ले इंफोनमेंट 360-डिग्री कॅमेरा, वायरलेस चार्जर आणि 6 एअरबॅग्स दिल्या आहेत. यामध्ये 1.5-लीटर इंजिन दिले असून, जे शानदार माइलेज देते.
Tata Punch: डिसेंबरमध्ये टाटा मोटर्सच्या सर्वात स्वस्त SUV पंच ICE आणि EV मॉडेल्सच्या एकूण 15,073 युनिट्सची विक्री झाली. टाटा पंच ईव्हीची किंमत 9.99 लाख रुपयांपासून ते 14.29 लाख रुपयांपर्यंत आहे.
Tata Nexon: Tata Nexon चे ICE आणि EV मॉडेल्स उपलब्ध आहेत. मागील महिन्यात कारच्या 13,536 यूनिट्सची विक्री झाली. Tata Nexon EV ची किंमत 13.24 लाख रुपयांपासून सुरू होते. तुम्ही जर नवीन इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Tata Nexon चांगला पर्याय आहे.
Maruti Suzuki Fronx: डिसेंबर 2024 मध्ये Maruti Suzuki Fronx एसयूव्हीला ग्राहकांची चांगली मागणी होती. डिसेंबर महिन्यात 10,752 लोकांनी या गाडीला खरेदी केले. कारच्या बेस मॉडेलची किंमत 7.51 लाख रुपये आहे. तर टॉप व्हेरिएंटची किंमत 13.04 लाख रुपयांपर्यंत जाते.
Hyundai Venue: या कारचा देखील भारतातील सर्वात लोकप्रिय Sub 4m SUV सेगमेंटमध्ये समावेश होतो. डिसेंबर 2024 मध्ये कारच्या 10,265 यूनिट्सची विक्री झाली. ह्युंडाई वेन्यू एसयूव्हीला तुम्ही 7.94 लाख रुपयांपासून ते 13.62 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम किंमत) खरेदी करू शकता. प्रत्येक शहरानुसार कारच्या किंमत व ऑफर्सनुसार बदल होऊ शकतो.

