अवघ्या 4,999 रुपयात मिळतोय शानदार LED TV, फीचर्स खूपच जबरदस्त; डिटेल्स पाहाच

Best Smart TV Offers: भारतीय बाजारात अनेक कंपन्यांचे चांगले टीव्ही उपलब्ध आहेत. मोठ्या स्क्रीनसह येणाऱ्या स्मार्ट टीव्हीला खरेदी करण्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागतात. मात्र, तुम्ही जर LED TV खरेदी करण्याचा विचार करत असाल तर बाजारात 10 हजार रुपयांच्या बजेटमध्ये येणारे काही चांगले पर्याय उपलब्ध आहेत. 10 हजार रुपयांच्या बजेटमध्ये येणाऱ्या काही एलईडी टीव्हींविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
VW 24 inches Premium Series HD Ready LED TV
ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर हा 24 इंच एलईडी टीव्ही फक्त 4,999 रुपयात उपलब्ध आहे. फ्रेमलेस डिझाइनसह येणाऱ्या या टीव्हीमध्ये 60 हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येणारा डिस्प्ले देण्यात आला आहे. यात 20 वॉटचे दमदार साउंड आउटपुट मिळतील. तसेच, कनेक्टिव्हिटीसाठी HDMI पोर्ट देण्यात आला आहे. या टीव्हीवर कंपनी ग्राहकांना 1 वर्षाची वॉरंटी देत आहे.
Acer 32 inches Advanced N Series Standard LED TV
Acer चा हा टीव्ही Amazon वर 7,999 रुपयात उपलब्ध आहे. यामध्ये 32 इंच एचडी डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन 1366 x 768 पिक्सल आहे. यात दमदार साउंडसाठी 24 वॉटचे स्पीकर्स देण्यात आले आहे. तसेच, कनेक्टिव्हिटीसाठी 3 HDMI आणि 2 USB पोर्ट मिळतील. या टीव्हीच्या खरेदीवर कंपनी 1 वर्षाची वॉरंटी देखील देत आहे.
Kodak 32 inches Special Edition Series HD Ready Smart LED TV
Amazon वर कोडकचा हा टीव्ही खूपच स्वस्तात उपलब्ध आहे. फ्रेमलेस डिझाइनसह येणाऱ्या या टीव्हीमध्ये 400 नीट्स ब्राइटनेस लेव्हल असणारा 32 इंच डिस्प्ले दिला आहे. यात 512 एमबी रॅम आणि 4 जीबी इंटर्नल स्टोरेज देखील मिळेल. हा टीव्ही MLogic Quad Core चिपसेटसह येतो. यात कनेक्टिव्हिटीसाठी 3 HDMI आणि 2 यूएसबी पोर्ट देण्यात आलेत. या टीव्हीला फक्त 8,499 रुपयात घरी घेऊन जाऊ शकता. तुम्ही जर एलईडी टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या पर्यायांचा नक्कीच विचार करू शकता.





