लालबागच्या गर्दीत बेस्ट बस घुसली; प्रवाशाने चालकासोबत हुज्जत घातली अन्…., नेमकं काय घडलं?

Lalbaug Accident| गणपती आगमनानिमित्त सर्वत्र लगबग पाहायला मिळत आहे. परंतु रविवारी लालबागचा राजा येथील गरम खाडा मैदानासमोर एक धक्कादायक प्रकार घडला आहे. रविवारी बाप्पाच्या आगमनाच्या धामधुमीत लालबागमधील गणेश टॉकीज परिसरात भीषण अपघात झाला आहे. बसमधील दारूड्या प्रवाशाने चालकासोबत हुज्जत घालत स्टेअरिंग जबरदस्तीने फिरवल्याने अपघात झाला. या अपघातामध्ये आठ जण जखमी झाले आहे. तर एका तरुणीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
गणेशोत्सवापूर्वीचा शेवटचा रविवार असल्यामुळे लालबागमध्ये मोठी गर्दी होती. त्यादरम्यान बेस्टची 66 क्रमांकाची बस अनियंत्रित झाल्याने अपघात घडला आहे. बसमधील मद्यधुंद प्रवाशामुळे मुंबईत लालबाग परिसरात बस अपघातामध्ये तरुणीचा मृत्यू झाला आहे. तर जखमींपैकी 3 जणांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. बसमध्ये मद्यधुंद प्रवाशानं चालकासोबत वाद घातला आणि नियंत्रण सुटून अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. Lalbaug Accident|
नेमकं काय घडलं?
बेस्ट प्रशासनाची 66 क्रमांकाची बस राणी लक्ष्मीबाई चौक सायन इशून बॅलार्ड पियरच्या दिशेनं जात होती. या बसमधून एक मद्यधुंद प्रवासी प्रवास करत होता. एक मद्यधुंद प्रवासी चालक आणि वाहकासोबत वाद घालत होता. त्यानंतर या मद्यधुंद प्रवाशानं ड्रायव्हरला ओढलं त्यामुळे त्याचा गाडीवरचा ताबा सुटला आणि अपघात झाला. या दरम्यान, फुटपाथवरुन जाणारे काही पादचारी जखमी झालेत. तर अनेक वाहनांचेही नुकसान झाले आहे. याप्रकरणी बसमधील मद्यधूंद प्रवाशाला ताब्यात घेतले आहे. Lalbaug Accident|
हेही वाचा:
तेलंगणा-आंध्र प्रदेशात पावसाचा तांडव ! 24 लोकांचा मृत्यू ; शाळा बंद, 100 हून अधिक गाड्या रद्द


