इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलच्या पंतप्रधानांचा मोदींना फोन ; वाचा दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली?

Benjamin Netanyahu-PM Modi। इराणसोबत वाढत्या तणावादरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवर संवाद साधला असल्याची माहिती समोर आले आहे. यादरम्यान, दोन्ही नेत्यांनी इराण-इस्रायल संघर्षानंतरच्या सद्यस्थितीवर चर्चा केली. पंतप्रधान मोदींनी स्वतः ट्विटरवर ही माहिती पोस्ट केली.
पंतप्रधान मोदींनी एका पोस्टमध्ये,”मला इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचा फोन आला. त्यांनी मला सद्यस्थितीबद्दल माहिती दिली. मी भारताच्या चिंता व्यक्त केल्या आणि या प्रदेशात शांतता आणि स्थिरता लवकरात लवकर पुनर्संचयित करण्याची गरज यावर भर दिला.”असे म्हटले आहे.
इस्रायलच्या हल्ल्यात ७८ इराणी लोकांचा मृत्यू Benjamin Netanyahu-PM Modi।
इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी इराणशी सुरू असलेल्या संघर्षाच्या संदर्भात हा फोन केला असल्याचे म्हटले आहे. शुक्रवारी इस्रायलने इराणच्या अणु सुविधा, क्षेपणास्त्र निर्मिती केंद्रे आणि लष्करी कमांडर्सवर हवाई हल्ले केले. यामध्ये ७८ जणांचा मृत्यू झाला आहे आणि तीनहून अधिक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे.
Received a phone call from PM @netanyahu of Israel. He briefed me on the evolving situation. I shared India’s concerns and emphasized the need for early restoration of peace and stability in the region.
— Narendra Modi (@narendramodi) June 13, 2025
इस्रायलने या ऑपरेशनला ‘ऑपरेशन रायझिंग लायन’ असे नाव दिले आहे. पंतप्रधान नेतान्याहू यांनी याला देशाच्या इतिहासातील एक निर्णायक क्षण म्हटले आहे आणि म्हटले आहे की या हल्ल्याने “इराणच्या अणु कार्यक्रमाचे केंद्र” लक्ष्य केले आहे.
भारताने आधीच केली होती चिंता व्यक्त Benjamin Netanyahu-PM Modi।
भारताने आधीच या परिस्थितीबद्दल अगोदरच चिंता व्यक्त केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते की, भारत या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि परिस्थिती आणखी वाढू नये यासाठी दोन्ही देशांना आवाहन करत आहे. या तणावादरम्यान नेतन्याहू यांनी अनेक जागतिक नेत्यांशी चर्चा केली, ज्यात जर्मन चांसलर फ्रेडरिक मर्झ आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा समावेश आहे.
दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कडक इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की अमेरिका जगातील सर्वात घातक शस्त्रे बनवते आणि इस्रायलकडे त्यापैकी अनेक आहेत. त्यांनी असेही म्हटले आहे की इराणला अजूनही करारावर पोहोचण्याची दुसरी संधी मिळू शकते.





