जवस ही तेल बी पण आहे. जवसाचे तेल स्वयंपाकघरात पदार्थ बनवताना आवश्य वापरावे. तसेच हाडाच्या विकारांवर उपयुक्त मानली आहे. जवसाची चटणी रोज आपल्या आहारात नियमित समाविष्ट करणे आवश्यक आहे. तर जाणून घेऊया जवसाचे औषधी उपयोग…
लघवी साफ, दाह कमी होण्यासाठी
– लघवी करतेवेळी दाह किंवा आग होत असेल तर जवसाचा काढा द्यावा. हा काढा करण्याची कृती अशी, 12 ग्रॅम जवस व 6 ग्रॅम ज्येष्ठमध घेऊन ते चांगले ठेचून त्याचा 1 लिटर पाण्यात अंदाजे एक अष्टमांश उरेल एवढा काढा करावा. मग त्यात 12 ग्रॅम खडीसाखर घालून दोन चमचे रोज सकाळ संध्याकाळ प्यावे; लघवीची जळजळ कमी होते तसेच लघवीस साफ होते.
दंतरोगावर –
हिरड्या मजबूत रहाव्या व दंतदुखीवर उपचार म्हणून जवसाच्या तेलाने मसाज करावा.
कफ पातळ होण्यासाठी –
कफयुक्त ज्वरात (तापावर) जवसाच्या पिठाचे पोटीस करून छाती शेकली असता कफ पातळ होतो व ताप लगेच उतरतो.
पाठदुखीवर –
पोट, पाठ वगैरे ठिकाणी एकसारखे दुखत असेल तर दुखणाऱ्या जागी जवसाचे पोटीस बांधीत जावे.