Lords Opening Record : लॉर्ड्सवर भारतीय गोलंदाजांची दैना! ३६ वर्षांचा इतिहास बदलत इंग्लंडच्या नव्या ओपनिंग जोडीने घातला धुमाकूळ
Lords Opening Record : इंग्लंडची नवी सलामी जोडी बेन डकेट आणि जॅकब बेथेल यांनी पहिल्या विकेटसाठी शतकीय भागीदारी रचून इतिहास घडवला.

Ben Duckett Jacob Bethell Century Partnership Record IND vs ENG 3rd ODI : भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेच्या तिसऱ्या आणि निर्णायक वनडे सामन्यात यजमान इंग्लंडने लंडनच्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर वादळी सुरुवात केली आहे. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडच्या सलामीवीरांनी भारतीय गोलंदाजीचे वाभाडे काढले. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीचा पूर्ण फायदा उठवत इंग्लंडच्या फलंदाजांनी मैदानाभोवती चौफेर धावांचा पाऊस पाडला. भारतीय आक्रमण धारहीन ठरल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात इग्लंडच्या ओपनिंग जोडीने ३६ वर्षांचा दुष्काळ संपुष्टात आणला आहे.
नव्या ओपनिंग जोडीने संपवला ३६ वर्षांचा दुष्काळ –
या सामन्यात इंग्लंडची नवी सलामी जोडी बेन डकेट आणि जॅकब बेथेल यांनी पहिल्या विकेटसाठी शतकीय भागीदारी रचून इतिहास घडवला. या तुफानी शतकीय भागीदारीच्या जोरावर इंग्लंडने भारतीय संघाविरुद्ध लॉर्ड्सच्या मैदानावर तब्बल ३६ वर्षांचा मोठा दुष्काळ संपवला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात तब्बल ३६ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर लॉर्ड्सवर इंग्लंडच्या एकाही सलामीच्या जोडीला भारताविरुद्ध शतकीय भागीदारी करता आली नव्हती, तो शाप आज या जोडीने मोडीत काढला.
२०१० नंतर पहिल्यांदाच घडला ‘हा’ चमत्कार!
🏏 𝟑𝐫𝐝 𝐎𝐃𝐈 𝐈𝐧𝐝𝐢𝐚 𝐯𝐬 𝐄𝐧𝐠𝐥𝐚𝐧𝐝 🏏
ENGLAND 🏴 2️⃣6️⃣1️⃣-1️⃣ (40 ov) vs INDIA 🇮🇳 | CRR : 6.52
Current Batsmen :
Ben Duckett* : 127 (125)
Joe Root* : 23 (22)Jocob Bethell : 91 (93)
Prasidh Krishna : 1-36 (8)#ENGvIND #INDvsENG #ODI pic.twitter.com/GKWVf1CEGk
— Cricket Lover 🏏 (@Crick97924Lover) July 19, 2026
डकेट आणि बेथलच्या जोडीने पहिल्या विकेट्ससाठी तब्बल १९२ धावांची विक्रमी पार्टनरशीप केली. ही पार्टनरशीप बेथलच्या विकेट्सनी फुटली. तो ९१ धावांवर बाद झाला, पण डकेटने आपले शतक पूर्ण केले. लॉर्ड्स मैदानावरील एकूण विक्रमांचा विचार केल्यास, २०१० नंतर पहिल्यांदाच इंग्लंडच्या सलामीवीरांनी येथे १०० हून अधिक धावांची भागीदारी केली आहे. यापूर्वी सप्टेंबर २०१० मध्ये अँड्र्यू स्ट्रॉस आणि स्टीव्हन डेव्हिस यांनी पाकिस्तानविरुद्ध ११३ धावांची सलामी दिली होती. त्यानंतर तब्बल १६ वर्षांनी लॉर्ड्सवर हा पराक्रम झाला आहे.
वनडे क्रिकेटमधील फुटली मोठी कोंडी!
– Test Hundred vs IND in India.
– Test Hundred vs IND in England.
– ODI Hundred vs IND in England.BEN DUCKETT – A Star of England batting in Tests & ODIs 🔥 pic.twitter.com/ttXA41RMgb
— Johns. (@CricCrazyJohns) July 19, 2026
केवळ लॉर्ड्सवरच नाही, तर एकंदरीत वनडे क्रिकेटमध्येही इंग्लंडसाठी ही शतकीय सलामी खूप मोठ्या कालावधीनंतर आली आहे. २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात धर्मशाला येथे बांगलादेशविरुद्ध जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड मलान यांनी ११५ धावांची भागीदारी केली होती. त्यानंतर तब्बल ३ वर्षांनी (२०२६ मध्ये) इंग्लंडला कोणत्याही मैदानावर वनडेत शतकीय ओपनिंग पार्टनरशिप करण्यात यश आले आहे. या विक्रमी सुरुवातीमुळे टीम इंडिया बॅकफूटवर फेकली गेली आहे.





