पुणे जिल्हा | लाडकी बहीण रुसू लागली ; योजनेचे अर्ज भरण्यासाठी महिलांची गर्दी

वडापुरी, (वार्ताहर)- लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळण्यासाठी वाट पाहावी लागणार असली तरी सध्या इंदापूर तालुक्यात या योजने मुळे महा ई सेवा, आधार केंद्र, सेतू सुविधा केंद्रावर मात्र महिलांची मोठीगर्दी दिसत आहे. या योजनेला लागणारे आधार अपडेटसाठी सर्व बँकांसमोर महिलांची गर्दी होत आहे. अनेक कारणांमुळे धापवळ होत असल्याने लाडकी बहीण आता रुस् लागल्याचे चित्र दिसत आहे.
लाडकी बहीण सन्मान योजनेच्या लाभासाठी कागदपत्रं दाखल करण्याची 15 ऑगस्ट ही डेडलाइन असल्याने ऑनलाइन सर्व्हिस देणार्या सर्वच केंद्रावर महिलांची गर्दी वाढली आहे.
शासनाने कमीत कमी कागदपत्रं घोषित करुनही लोकांना लाडकी बहीण योजनेचे ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. त्या अडचणीप्रमाणे महिलांची ऑनलाइन सेंटरवर गर्दी दिसत आहे; परंतु ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी नेटवर्कचा प्रॉब्लेम येत असल्याने महिलांची निराशा होत आहे.
या करणानाने होतील अर्ज रद्द
जॉईंट अकाऊंट चालत नाही
हमीपत्र वर खाडा खोड
बँकेत नवीन अकाऊंट ओपन केले आहे; पण आधार बँक लिंक नसणे
डॉक्युमेंट स्पष्ट दिसत नसणे
रेशनकार्ड नीट दिसत नसणे
आधार, रेशनकार्ड पत्ता वेगळा असणे
आधारची मागची, पुढची बाजू न जोडणे
आधारवर पूर्ण जन्म तारीख नसणे
फॉर्म मराठीमध्ये भरणे
आधार वरचे नाव, पासबुकचे नाव चुकीचे असणे
रेशनकार्डमध्ये नाव, आधार कार्ड बँक खात्याला मोबाइल लिंक नसणे
असे अनेक मुद्दे चर्चेत असल्याने महिलांमध्ये संभ्रमावस्था आहे.


