Pune District : बेल्हे प्रादेशिक नळ पाणी योजनेला मिळणार गती
Pune District : संबंधित पत्र विभागाला शिफारस करून पाठविले आहे. सुरळीत योग्य पाणी पुरवठा सर्व गावांना व्हावा, यासाठी ही योजना अत्यंत गरजेची आहे.

बेल्हे : बेल्हे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना लवकर पूर्ण करून समाविष्ट सर्व गावांना लवकरात लवकर पिण्याचे पाणी नवीन नळ योजनेतून मिळावे, यासाठी योजनेचे रखडलेले काम पूर्ण करण्याच्या सुचना देणेकामी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची ॲड. विजय कुऱ्हाडे यांनी मुंबई येथे भेट घेतली.
बहुप्रतिक्षित बेल्हे प्रादेशिक पाणी पुरवठा नळ योजना २५-३० वर्षेहून अधिक जुनी झालेली असून तीच्या नुतनीकरणासाठी माजी आमदार अतुल बेनके यांच्या प्रयत्नाने उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाब पाटील यांनी मंजूरी देत ९७ कोटी रूपये मंजूर केले होते. सदर योजनेचे काम रखडलेले असून तातडीने निधी उपलब्ध होणे आणि योजना पूर्ण करून नव्याने समाविष्ट गावांसह सर्व गावांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देणे, यासाठी ॲड. विजय कुऱ्हाडे यांनी सोमवारी (दि.२५) जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली.
सुनेत्रा पवार यांनीही संपूर्ण विषय समजून घेवून कार्यवाही करू, अशी ग्वाही दिली. संबंधित पत्र विभागाला शिफारस करून पाठविले आहे. सुरळीत योग्य पाणी पुरवठा सर्व गावांना व्हावा, यासाठी ही योजना अत्यंत गरजेची आहे. तरी सदरचे काम मार्गी लागावे यासाठी आपण सदैव प्रयत्नशील आहे, अशी माहिती कुऱ्हाडे यांनी दिली.
हेही वाचा : Pune District : पेसा भागात कृषी पदभरती जलदगतीने : दत्तात्रय भरणे





