“प्रत्येक युनिफॅार्ममागे एक आई आहे”; आलियाच्या भावूक पोस्टने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

Posted by Alia Bhatt : भारत आणि पाकिस्तानमधील तणावर अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘अॅापरेशन सिंदूर’चे कौतुक केले. या पोस्टच्या माध्यमांतून सेलिब्रेटींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पण अशाही काही सेलिब्रिटी आहेत, की त्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या नव्हत्या. यापैकी एक असलेली अभिनेत्री आलिया भटने आता आपली प्रतिक्रिया सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. आलियाने भारताच्या सैनिकांसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.
या पोस्टमधून आलियाने सांगितले की, काही रात्री तिच्यासाठी आणि संपूर्ण देशासाठी खूप वेगळ्या होत्या. याशिवाय, आलियाने देशाच्या सैनिकांसाठी, त्यांच्या कुटुंबियांसाठी आणि मातांसाठी एक खास संदेशही लिहिला आहे. आलियाने लिहिले, ‘गेल्या काही रात्री खूप वेगळ्या होत्या. जेव्हा एखादा देश श्वास रोखून धरतो, तेव्हा हवेत एक प्रकारची शांतता असते. आणि गेल्या काही दिवसांत आपल्याला ती शांतता जाणवत आहे. ती शांत चिंता. प्रत्येक बातमीच्या सूचना आणि संभाषणासोबत ताणतणाव वाढतो.” ‘प्रत्येक वेळी जेव्हा मला वाटते की डोंगरांमध्ये कुठेतरी आपले सैनिक जागे, सतर्क आणि धोक्यात आहेत तेव्हा मला वाईट वाटते, असे ती म्हणाली आहे.
View this post on Instagram
आपण घरात असताना काही पुरुष आणि स्त्रिया अंधारात त्या ठिकाणी उभ्या असतात, ज्यांच्यामुळे आपण शांतपणे झोपू शकतो. तुम्हाला हे समजते की ते फक्त शौर्य नाही, तर त्याग आहे. आलियाने पुढे लिहिले की, ‘आम्ही रविवारी मदर्स डे साजरा केला. आम्ही फुले देत होतो आणि एकमेकांना मिठी मारत होतो, तेव्हा मी त्या मातांचाही विचार करत होते, ज्यांनी आपल्यासाठी आपले जीवन धोक्यात घालणाऱ्या खऱ्या नायकांना वाढवले आहे. आम्ही त्यांच्यासाठी शोक व्यक्त करत आहोत, जे मृत्युमुखी पडले आहेत. ते सैनिक जे कधीही घरी परतणार नाहीत, त्यांच्या कुटुंबियांना शक्ती मिळो. अश्रू रोखणाऱ्या प्रत्येक पालकाला प्रेम द्या. आपण एकत्रित उभे राहूयात आपल्या रक्षकांसाठी असा संदेश तिने या पोस्टमधून दिला आहे.





