ट्रम्प यांच्याआधी ‘या’ नेत्यांवरही झालाय प्राणघातक हल्ला; अनेकांनी गमावला जीव

Leaders Attacked| अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निवडणूक रॅलीदरम्यान गोळीबार करण्यात आल. या गोळीबाराच्या घटनेत गोळी ट्रम्प यांच्या कानाला स्पर्श करून गेली आणि त्यांच्या कानातून रक्त वाहत असल्याचे दिसून आले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. ट्रम्प यांच्यावरील या प्राणघातक हल्ल्यानंतर जगभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. ट्रम्प यांच्याव्यतिरिक्त काही प्रसिद्ध नेत्यांवर देखील प्राणघातक हल्ला झाला आहे.
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची 8 जुलै 2022 रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने संपूर्ण जग हादरले होते. नारा शहरात रॅली काढत असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला. हल्लेखोरांनी त्याच्यावर दोन राऊंड गोळीबार केला, ज्यामध्ये एक गोळी त्याच्या छातीतून गेली आणि दुसरी गोळी त्याच्या मानेला लागली.
जॉन एफ केनेडीची हत्या
अमेरिकेचे ३५ वे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांची २२ नोव्हेंबर १९६३ रोजी हत्या झाली. केनेडींवर हल्ला झाला तेव्हा ते त्यांच्या कारमधून जात होते. यावेळी हल्लेखोराने त्यांच्यावर गोळीबार केला ज्यात त्यांचा मृत्यू झाला.
स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको
15 मे 2024 महिन्यात स्लोव्हाकियाचे पीएम रॉबर्ट फिको यांच्यावर अनेक गोळ्या झाडण्यात आल्या होत्या, त्यात ते गंभीर जखमी झाले होते. हँडलोवा येथील एका सांस्कृतिक केंद्रात सभेनंतर लोकांना अभिवादन करत असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला. Leaders Attacked|
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर ३ नोव्हेंबर २०२२ रोजी रॅली सुरू असताना जीवघेणा हल्ला झाला. यादरम्यान हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला, जी त्यांच्या पायाला लागली. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
बेनझीर भुट्टो यांचीही पाकिस्तानात हत्या
पाकिस्तानच्या पहिल्या महिला पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचीही 27 डिसेंबर 2007 रोजी हत्या झाली होती. भुट्टो पाकिस्तानातील रावळपिंडी येथे प्रचार करत असताना त्यांच्यावर हल्ला झाला. दरम्यान हल्लेखोर त्यांच्याजवळ आला आणि त्याने गोळ्या झाडल्या. Leaders Attacked|
इंदिरा गांधींची हत्या
भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचीही गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. 31 ऑक्टोबर 1984 रोजी त्यांच्याच अंगरक्षकांनी त्यांची हत्या केली होती. हे हत्याकांड घडवून आणणारे हल्लेखोर ऑपरेशन ब्लू स्टारमुळे संतप्त झाले होते. Leaders Attacked|
हेही वाचा :
वाटला बॉम्ब निघाला खजिना; खोदकाम करताना मजुरांना सापडले सोन्या-चांदीचे दागिने





