नवी दिल्ली : काँग्रेसची सध्या तेलंगणात शेतकरी रॅली सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, या रॅलीच्या अगोदरच राहुल गांधी यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. भाजपा नेते अमित मालवीय यांनी हा व्हिडीओ शेअर करत राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.
अमित मालवीय यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ तेलंगणात शेतकरी रॅली सुरू होण्याआधीचा आहे. यामध्ये राहुल गांधी काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा करताना दिसत आहेत. मात्र, यादरम्यान आजचा विषय काय? मला काय बोलायच आहे? असा प्रश्न राहुल सहकाऱ्यांना विचारताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
Yesterday, Rahul Gandhi before his rally in Telangana, supposedly in solidarity with farmers, asks what is the theme, क्या बोलना है! 🤦♂️
This is what happens when you do politics in between personal foreign trips and nightclubbing…
Such exaggerated sense of entitlement. pic.twitter.com/NdRBDlGNK3
— Amit Malviya (@amitmalviya) May 7, 2022
भाजपा नेते अमित मालवीय यांनी आपल्या ट्विटर अकांऊटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. सोबतच ‘जेव्हा तुम्ही वैयक्तिक परदेशी सहली आणि नाईट क्लबिंगच्या मध्ये राजकारण करता तेव्हा असं होतं’, असा टोलाही मालवीय यांनी राहुल गांधींना लगावला आहे.
Rahul Gandhi was at a nightclub when Mumbai was under seize. He is at a nightclub at a time when his party is exploding. He is consistent.
Interestingly, soon after the Congress refused to outsource their presidency, hit jobs have begun on their Prime Ministerial candidate… pic.twitter.com/dW9t07YkzC
— Amit Malviya (@amitmalviya) May 3, 2022
याआधीही मालवीय यांनी राहुल गांधीचा एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यात ते नेपाळच्या एका नाईटक्लबमध्ये दिसून आले होते. त्यांच्यासोबत एक महिलाही होती. या व्हिडीओवरून राहुल गांधीवर भाजपाने टीकास्त्र सोडले होते.
राहुल गांधी सध्या दोन दिवसाच्या तेलंगणा दौऱ्यावर आहेत. तेलंगणात काँग्रेसची पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. वारंगलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेला राहुल गांधीनी संबोधित केले. यारदम्यान त्यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यावर जोरदार टीकाही केली. एवढचं नाही तर काँग्रेस टीआरएस सोबत हातमिळवणी करणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे.