गोमांस विकणाऱ्यांस रासुकाखाली अटक
Updated On:

इंदोर – मध्य प्रदेशातील इंदोर शहरात गोमांस विकणाऱ्या एका 39 वर्षीय इसमास राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करण्यात आली आहे. शहराचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक महेशचंद्र जैन यांनी ही माहिती दिली.
दक्षिण तोडा भागात तो हा प्रकार करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून त्याला मुद्देमालासह ताब्यात घेतले. बकरीचे मांस विकण्यासाठी परवाना असलेल्या दुकानात तो हे मांस विकत होता.
त्याने नेमके कोठून हे मांस मिळवले वगैरे तपास आता सुरू झाला आहे. या इसमाचे नाव पोलिसांनी जाहीर केलेले नाही पण त्याने या आधीही इंदोर आणि उज्जेैन येथे हा प्रकार केला होता.
त्यामुळे त्याच्यावर आधीचे दोन गुन्हे दाखल असल्याने यावेळी ही रासुकाची कारवाई करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.





