बीडमध्ये 7 HIV बाधित जोडपे अडकले विवाहबंधनात
Updated On:

बीड – जिल्हा प्रशासन आणि सामाजिक संघटनांनी समोर येत बीडमध्ये सात एचआयव्ही बाधित जोडप्यांचा विवाह सोहळा घडवून आणला. व्यथित होऊन निराशमय जीवन जगणाऱ्या एचआयव्ही ग्रस्तांना आता कायमस्वरुपी आधार मिळाला आहे.
बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी या जोडप्यांचे कन्यादान केले. सुनील लांजेवार यांनी मणी मंगळसूत्र देऊन सामाजिक जबाबदारी पार पाडली तर अजित पवार यांनी संसारउपयोगी साहित्य दिले. दुर्धर आजारातून जीवन जगताना या देखील जोडप्यांना आनंदी राहून संसार फुलविण्याचा अधिकार आहे. त्यामुळे समाजाने भेदभाव करू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले.





