Beed Accident : अहमदपूर – अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर बीड जिल्ह्यातील वाघिरा फाट्याजवळ आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात (Beed Accident) झाला. या अपघातात भारतीय सैन्यदलात नुकताच भरती झालेल्या 20 वर्षीय जवानाचा जागीच (Beed Accident) मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. अपघात कसा घडला? संदिपान भगवान बांगर (वय २०) हे पाटोदा तालुक्यातील वाघिरा गावचे रहिवासी होते. ते मोटरसायकलवरून वाघिरा फाट्यावरून गावाकडे परतत होते. त्याचवेळी समोरून येणाऱ्या सातारा येथील एका चारचाकी वाहनाने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, संदीपान बांगर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. Beed Accident सैन्यदलातील नवभर्ती जवान संदिपान बांगर हे अवघ्या २० व्या वर्षी भारतीय सैन्यदलात भरती झाले होते. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, ते नुकतेच सैन्यात दाखल झाले होते. त्यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावातील नागरिकांनी त्यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला असून, तरुण जवानाच्या निधनाने गावात शोकाचे वातावरण आहे. पोलिस कारवाई अपघाताची माहिती मिळताच लिंबागणेश पोलीस चौकीचे सहायक फौजदार गणेश परझणे आणि तलाठी गणपत पोतदार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आणि अपघाताची नोंद घेतली. संदीपान बांगर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेकनूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी अपघातग्रस्त (Beed Accident) चारचाकी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. अपघातात वेग आणि नियमभंग हे प्रमुख कारण असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.