ओपन ब्लेजर घातलेल्या मंदिरा बेदीच्या बोल्ड लूकने वेधले, ‘चाहत्यांचे लक्ष’

९० च्या दशकात टीव्ही सीरियल ‘शांती’ने प्रसिद्ध झालेल्या मंदिरा बेदीला आज ओळखीची गरज नाही. केवळ अभिनयच नाही तर तिच्या सौंदर्य आणि स्टाईलचेही लोक वेडे आहेत. मंदिरा बेदी 52 वर्षाची असली तरी तिच्या चेहऱ्यावरील चमक आणि फिटनेसवरून तिच्या वयाचा अंदाज कोणी लावू शकत नाही. मंदिराचे सोशल मीडियावर अनेक चाहते आहेत जे तिचे नेहमीच कौतुक करत असतात, अशात तिचे सोशल मीडियावरील लेटेस्ट फोटोशूट चर्चेत आले आहे.
मंदिरा बेदीने I Diva साठी फोटोशूट केले आहे. ज्यामध्ये मंदिरा यांनी अनेक आउटफिट घातल्याचे दिसून आले, परंतु युजर्सचे लक्ष तिच्या रिव्हिलिंग आउटफिटने वेधले आहे. ज्यामध्ये मंदिराने गुलाबी रंगाचा ब्लेझर आणि पँट घातला आहे. यासोबतच तिचे दोन वेगवेगळ्या आउटफिटमधले फोटो आहेत, मात्र फक्त एकाच फोटोची चर्चा आहे.
View this post on Instagram
तिच्या या आऊटफिटवर चाहत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मंदिराच्या लूकचे सर्वजण कौतुक करत आहे. तिचा बोल्डनेस पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहे. मंदिरा या वयात स्वत:ला कशी फिट ठेवते, असे काहींचे म्हणणे आहे. तर काहींना मंदिराचा बोल्ड फोटोशूट आवडलेला नाही. या लूकवर संमिश्र प्रतिक्रिया येतांना दिसत आहे.
दरम्यान, 2021 मध्ये मंदिरा बेदी यांनी पती राज कौशल यांना गमावले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. 1999 मध्ये दोघांचे लग्न झाले आणि लग्नाच्या अनेक वर्षानंतर 2011 मध्ये मंदिराला मुलगा झाला, त्याचे नाव तिने वीर ठेवले. यानंतर दुसरे अपत्य होण्याच्या इच्छेने मंदिराने २८ जुलै २०२० रोजी एका ४ वर्षाच्या मुलीला दत्तक घेतले, तिचे नाव तिने तारा ठेवले.





