“अपघात प्रकरणात सूनबाई अडकल्या म्हणून…,” कोठारेंच्या विधानावरुन किशोरी पेडणेकरांची टिका

Mahesh Kothare | मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांनी एका कार्यक्रमात भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केलं. ‘मी भाजपचा आणि मोदीजींचा भक्त आहे’, असं ते म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्यावर आता राजकीय क्षेत्रातील विविध नेत्यांकडून टीका केली जात आहे.
यावरुन आता मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी महेश कोठारेंवर जहरी टीका केली आहे. अपघात प्रकरणात सूनबाई अडकल्या म्हणून आता मुक्ताफळं उधळली जात आहेत, अशी टीका किशोरी पेडणेकरांनी महेश कोठारेंवर केली.
“महेश कोठारे कलाकार आहेत हे बरोबर आहे, पण एका अपघात प्रकरणात सूनबाई अडकल्या होत्या. तिला कसं वाचवायचं? तर अशी मुक्ताफळं, सुमनं उधळल्याशिवाय काही होत नाही. जी काही संस्कृती तयार होते, मी नाव नाही घेणार, कारण कुठल्याही जातीचा मला अपमान करायचा नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ज्या संस्कृतीने संपूर्ण महाराष्ट्रावर शौर्य दाखवलं आणि शौर्याबरोबर क्रोर्यही दाखवलंय. मी एवढंच म्हणेन. वेळ येते तेव्हा कलाकारांना बाळासाहेब आणि उद्धवजी आठवतात. त्यांचा निषेध आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया पेडणेकरांनी दिली. Mahesh Kothare |
उर्मिला कोठारे अपघात प्रकरण
महेश कोठारेंची सून अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या ड्राइव्हरने 28 डिसेंबर 2024 रोजी मध्यरात्री गाडी भरधाव चालवून मेट्रोचं काम करणाऱ्या दोन कामगारांना धडक दिली होती. या अपघातात सम्राटदास जितेंद्रदास या कामगाराचा मृत्यू झाला होता, तर उर्मिलासह तिचा ड्राइव्हर गजानन पाल आणि कामगार सुजन रविदास जखमी झाले होते. Mahesh Kothare |
हेही वाचा
लाडकी बहिण योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय, ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार ?





