फॅन सेल्फी मागत राहली अन् करीनाने केलं दुर्लक्ष, युजर्स म्हणाले,’सर्वात उद्धट सेलिब्रिटी’

मुंबई – अभिनेत्री करीना कपूर ही बी-टाऊनमधील सर्वात चर्चेत असलेली अभिनेत्री आहे. करीनाचे असंख्य चाहते आहे, परंतु कधीकधी एक छोटीशी चूक सेलेब्रेटींना महाग पडते. करिनाचा एक लेटेस्ट व्हिडिओ समोर आला आहे, जे पाहून यूजर्स तिला वाईटरित्या ट्रोल करत आहेत.
दरम्यान, करीना कपूर नुकतीच मुंबई विमानतळावर दिसली होती. यावेळी रीना एअरपोर्टवर फुल स्वॅगमध्ये दिसली. करीना कपूरचा विमानतळावरील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. क्लिप पाहिल्यावर असे दिसते की करीना विमानतळावरून तिच्या कारकडे चालत असताना एका लेडी फॅनने तिला तिच्यासोबत फोटो क्लिक करण्याची विनंती केली, परंतु करिनाने तिच्याकडे दुर्लक्ष केले ती फोटोसाठी पोज न देतच थेट निघून गेली.
सोशल मीडियावर करीना कपूरचे फॅन्ससोबतचे हे वागणे लोकांना आवडले नाही आणि त्यांनी ‘बेबो’ला चांगलेच ट्रोल केले. एकाने लिहिले, “हे लोक अप्रत्यक्षपणे अपमान करतात. ते त्यांच्या चाहत्यांना विसरतात. या लोकांमुळेच हे लोक स्टार आहेत.” यूजरने म्हटले की, “सर्वात उद्धट सेलिब्रिटी.” सध्या या व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहे. तर करीनाच्या काही फॅन्सने तिला पाठिंबा दिला आहे.





