चिमुरड्यांची कथा सांगणारा ‘खारी बिस्कीट’चा सुंदर ट्रेलर प्रदर्शित
Updated On:

मुंबई- सध्या मराठी चित्रपटसृष्टीत एकाहून एक हिट चित्रपट रिलीज होत असल्याचे दिसून येत आहे. अश्यातच आता चिमुरड्यांची एक सुंदर कथा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संजय जाधव दिग्दर्शित ‘खारी बिस्कीट’ येत्या १ नोव्हेंबरला चित्रपतगृहात दिसणार आहे. सध्या सर्वत्र ‘खारी बिस्कीट’ चित्रपटाची चर्चा रंगूलागली असून, चित्रपटातील गाणे देखील प्रेक्षकांच्या मनाला भिडली आहेत.
खारीसाठी बिस्कीट आणि बिस्किटसाठी खारी म्हणजे जीव की प्राण. अवघ्या पाच वर्षांच्या गोंडस खारीची इच्छा म्हणजे आठ वर्षांच्या बिनधास्त बिस्किटसाठी राजकुमारीचा हुकूम. मात्र, खारी हे जग तिच्या डोळ्यांनी पाहू शकत नसली तरी ती स्वप्नं बेमालूमपणे पाहते. ही गोष्ट आहे या दोघांची. खरीचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत झटणाऱ्या बिस्किटची आणि त्याच्यावर निरपेक्ष प्रेम करणाऱ्या खारीची. अशी चिमुरड्या भावंडांची जोडगोळी या चित्रपटात दिसून येणार आहे. त्यामुळे ‘खारी बिस्कीट’ हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडणार आहे.





