nagar | सासू, सुनेला मारहाण, सात जणांवर गुन्हा

राहुरी, (प्रतिनिधी)- लाईट पोल घेत असताना वाद निर्माण होऊन आरोपींनी सासू व सूनेला लाकडी काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना दि. २६ मे रोजी वांबोरी येथे घडली. परिघा बबन कोकाटे (वय ६५, रा. पाचीमहादेव वस्ती) यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, परिघा कोकाटे यांचे व भाऊसाहेब विष्णु कोकाटे यांच्यात लाईटचे पोलवरून वाद चालू आहेत.
दि. २६ मे रोजी सकाळी ११.३० वाजे दरम्यान भाउसाहेब कोकाटे याच्या शेडसमोर लाईटचे पोल रोवण्याचे काम चालू होते. तेव्हा परिघा कोकाटे व त्यांची सून तेथे गेल्या. तेथील वायरमनला सांगितेले की, आम्हाला पोलचे शिप्टींग करायचे आहे. आम्हाला दुसऱ्या डिपीवरून लाईट घ्यायची आहे. तेव्हा तेथे बसलेले आरोपी आले.
परिघा कोकाटे व त्यांच्या सुनेला लाकडी काठी व लाथ बुक्क्यांनी मारहाण केली. त्यांचा आरडोओरडा ऐकून तिथे परिघा कोकाटे यांचा मुलगा गंगाधर कोकाटे हा आला. त्यालादेखील मारहाण केली. या भांडणात परिघा कोकाटे यांच्या गळ्यातील सोन्याच्या पोतीचे नुकसान झाले. त्यांची सुन निकीता यांचा मोबाईल फोडला.
आरोपी भाऊसाहेब विष्णु कोकाटे, विष्णु मोहन कोकाटे, सोहन भाऊसाहेब कोकाटे, शरद विष्णु कोकाटे, राजेश्वरी भाऊसाहेब कोकाटे, शोभा शरद कोकाटे, वैष्णवी शरद कोकाटे, (रा. सर्व पाचीमहादेव वस्ती) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.





