Nagar : बचत गटाचे पैसे भरण्याच्या कारणावरून मारहाण
Updated On:

सोनई : नेवासा तालुक्यातील सोनई येथे बचतगटाचे पैसे भरण्याच्या कारणावरून दोन महिलांमध्ये मारहाण झाल्याची घटना घडली आहे.
दि. १४ रोजी फिर्यादी रेश्मा शायद सय्यद ही वैशाली शेटे यांचे घरासमोर बचतगटाचे पैसे भरून मला निल दाखला द्या, अशी चर्चा करत होती. त्याचवेळी संगिता कुऱ्हे ही त्या ठिकाणी आली. फिर्यादी महिलेस म्हणाली की, कुठल्याही बचत गटाचे पैसे भरायचे नाही तसेच हिला कुठलाही निल दाखला द्यायचा नाही.
आमच्या दोघींचा व्यवहार चालू आहे. तू मध्ये बोलण्याचे कारण नाही, असे बोलण्याचा राग आल्याने संगिता कुऱ्हे हिने फिर्यादी महिलेस लाथाबुक्यांनी मारहाण केली. याप्रकरणी सोनइ पोलीस ठाण्यात कुऱ्हे हिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सूरज मेढे करत आहेत.





