Pune Crime : 10 रुपयासाठी ग्राहकाला बेदम मारहाण; परमिट रुम मालक, वेटरवर गुन्हा दाखल
Updated On:

पुणे – ग्राहकाने अदा केलेल्या बिलातून उरलेले दहा रुपये मागितले, म्हणून परमिट रुम मालक व वेटरने ग्राहकावर हल्ला केला. त्यांनी ग्राहकाला लाकडी स्टम्पने मारुन जबरी दुखापत केली. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
हॉटेल मालक रमेश गोविंद संमम (57, रा.नाना पेठ) व वेटर निकम अशा दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी सागर गायकवाड (42,रा.गुलटेकडी) हे भवानी पेठेतील संबंधित परमिट रुम येथे गेले होते. त्यांनी बिलाची रक्कम आगाऊ दिली होती.
त्यातील दहा रुपये त्यांना हॉटेल मालकाकडून येणे होते. त्यांनी ही रक्कम परत मागितली असता, त्यांना शिविगाळ करुन धमकी देत हॉटेल बाहेर काढले. यानंतर स्टम्पने मारुन जखमी केले. तपास सहायक पोलीस निरीक्षक खोपडे करत आहेत.





