प्रियांका कि विराट ? Man Vs Wild फेम बेअर ग्रिल्सला कोणासोबत करायचं आहे ॲडव्हेंचर

मुंबई – ब्रिटीश साहसी आणि टीव्ही होस्ट बेअर ग्रिल्स त्याच्या रियालिटी शो ‘Man Vs Wild’ साठी प्रसिद्ध आहे. 48 वर्षीय ग्रिल्सने आपत्तीच्या परिस्थितीत कसे टिकून राहायचे हे अनेकदा दाखवून दिले आहे. ग्रिल्सने अनेक जागतिक भारतीय आयकॉनसह आपले एपिसोड केले आहेत. रणवीर सिंग, अजय देवगण आणि अक्षय कुमार यांच्यानंतर ग्रिल्स दोन भारतीय सेलिब्रिटींसोबत शूटची इच्छा व्यक्त केली आहे. हे दोन सेलेब्स देखील ग्लोबल आयकॉन आहेत.
बेअर ग्रिल्सने बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि भारतीय क्रिकेटर विराट कोहलीसोबत वाइल्ड अॅडव्हेंचर करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एका ईंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ग्रिल्सने खुलासा केला की, त्याला प्रियांका चोप्रा आणि विराट कोहलीसोबत एक ऍडव्हेंचर करायचे आहे. त्याने दोन्ही सेलिब्रेटींचे यावेळी भरपूर कौतुक केले आहे.
ग्रिल्स म्हणाला, “विराट कोहलीसोबत ऍडव्हेंचर करणे खूप जबरदस्त असेल. तो शेर दिल आणि साहसी माणूस आहे. प्रियांका चोप्रासोबत जाण इनक्रेडिबल असेल. तिचा पती निक माझ्यासोबत एका ऍडव्हेंचरसाठी घेऊन गेलो होतो, तो एक चांगला माणूस आहे. लोकांना त्याची प्रियांकासोबतची गोष्ट ऐकायला आवडेल. तसेच ग्रिल्सने यावेळी भारत नेहमीच माझ्या हृदयाजवळ असल्याचे म्हणत भारताचे कौतुक केले.





