Smart Sunglasses Ban : आयपीएलच्या क्लालिफायर-२ सामन्यापूर्वी बीसीसीआयचा मोठा निर्णय! ‘या’ गोष्टीवर घातली बंदी
Smart Sunglasses Ban : आयपीएल 2026 चे दोन सामने शिल्लक असताना बीसीसीआयने अचानक एक नवीन आदेश जारी केला असून, त्यात खेळाडू आणि सामना अधिकाऱ्यांना सामन्यादरम्यान या वस्तू वापरण्यास परवानगी दिली जाणार नाही, असे स्पष्टपणे म्हटले आहे.

BCCI Smart Sunglasses Ban IPL 2026 : आयपीएल २०२६ चा हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून स्पर्धेत आता केवळ दोनच सामने शिल्लक आहेत. आज (शुक्रवारी) ‘क्वालिफायर-२’ चा सामना खेळवला जाईल, तर रविवारी महाअंतिम सामना रंगणार आहे. आरसीबी संघाने आधीच फायनलमध्ये आपले स्थान पक्के केले असून आज जिंकणारा संघ त्यांच्याशी भिडणार आहे. मात्र, या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यांपूर्वी बीसीसीआयने सर्व संघ, खेळाडू आणि सामना अधिकाऱ्यांसाठी एक खळबळजनक नवीन फर्मान जारी केले आहे. मॅचदरम्यान खेळाडूंना आता ‘स्मार्ट सनग्लासेस’ वापरण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
भ्रष्टाचार विरोधी पथकाचा मोठा इशारा!
बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाने दिलेल्या महत्त्वपूर्ण सूचनेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. बीसीसीआयने सर्व फ्रँचायझींना एक अधिकृत अॅडव्हायझरी जारी केली आहे. यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, काही कंपन्या खेळाडूंना आणि सपोर्ट स्टाफला अत्याधुनिक कम्युनिशन फीचर्स असलेले स्मार्ट चष्मे पुरवत आहेत. हे सनग्लासेस लाईव्ह स्ट्रीमिंग, टेक्स्ट मेसेज पाठवणे आणि स्वीकारणे, वायफाय, मोबाईल डेटा आणि थेट कॉलिंग अशा प्रगत वैशिष्ट्यांनी सुसज्ज असतात. याद्वारे मैदानातून थेट संपर्क साधणे शक्य असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव यावर तात्काळ बंदी घालण्यात आली आहे. आता खेळाडूंना मोबाईल फोनसोबत हे स्मार्ट चष्मेही जमा करावे लागणार आहेत.
The BCCI’s Anti-Corruption Unit has barred the use of smart sunglasses by players and match officials in the ongoing Indian Premier League.
The Board urged players and officials to deposit the devices before entering the PMOA and warned of action in case of non-compliance.
Find… pic.twitter.com/mCdgtKAHTJ
— Sportstar (@sportstarweb) May 29, 2026
राजस्थान रॉयल्सच्या अधिकाऱ्याला बसला होता भुर्दंड!
काही दिवसांपूर्वी राजस्थान रॉयल्सचे अधिकारी रोमी भिंडर डगआऊटमध्ये बसून मोबाईल फोन वापरताना कॅमेऱ्यात कैद झाले होते. या नियमाच्या उल्लंघनानंतर बीसीसीआयने त्यांच्यावर १ लाख रुपयांचा दंड ठोठावला होता आणि कडक चेतावणी दिली होती. या घटनेमुळे बीसीसीआय अधिक सतर्क झाली आहे.
‘हनी ट्रॅपिंग’च्या धोक्यानंतर बीसीसीआय कडक!
🚨SMART GLASSES BANNED BY BCCI 🚫 🚨
🔸The BCCI’s Anti-Corruption and Security Unit has banned the use of smart sunglasses by players and match officials in the ongoing IPL🚫
🔸Reason is their advanced communication features, including live streaming and video calling via… pic.twitter.com/W6UKZuJrSZ
— Indian Cricket (@IPL2025Auction) May 29, 2026
बीसीसीआयने यापूर्वीही अनेक कडक नियम लागू केले आहेत. आयपीएलदरम्यान काही खेळाडूंचे कुटुंबीय आणि ओळखीचे लोक खेळाडूंच्या हॉटेल रूम्सपर्यंत पोहोचत असल्याच्या बातम्या आल्या होत्या, ज्यामुळे ‘हनी ट्रॅपिंग’चा मोठा धोका निर्माण झाला होता. या माहितीनंतर बीसीसीआयने हॉटेलमधील बाहेरील लोकांच्या प्रवेशावर बंदी घातली होती. तसेच खेळाडूंना परवानगीशिवाय उशिरा रात्री बाहेर जाण्यासही मनाई करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा बीसीसीआयने दिला आहे.





