IPL 2025 पुन्हा सुरू करण्यासाठी BCCI सज्ज! ‘या’ तीन शहरांमध्ये होणार उर्वरित सामने

बीसीसीआयने आयपीएल २०२५ च्या उर्वरित हंगामाच्या आयोजनासाठी काही शहरेही शॉर्टलिस्ट केली आहेत. ज्यामध्ये हैदराबाद, चेन्नई आणि बंगळुरू या शहरांचा समावेश आहे. याबाबत बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, जेव्हा अशा बाबींचा विचार केला जातो, तेव्हा एक आठवडाही आयोजनासाठी खूप मोठा कालावधी असतो. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि जर परिस्थिती सुधारली तर सर्व मूळ ठिकाणीही सामने आयोजित केले जाऊ शकतात.
🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗜𝗔𝗟 𝗨𝗣𝗗𝗔𝗧𝗘 🚨
BCCI has shortlisted Bengaluru, Chennai, and Hyderabad as venues for the remainder of the season.
To be used only if the tournament resumes in May. ✅#IPL | #IPL2025 | #ViratKohli pic.twitter.com/Pzpvb9lhgq
— Indian Cricket Team (@incricketteam) May 10, 2025
दरम्यान, बीसीसीआयने हे देखील स्पष्ट केले आहे की जर सीमेवरील तणाव वाढत राहिला तर लीग पुन्हा आयोजित करण्यासाठी पर्यायी वेळेचा विचार केला जाऊ शकतो. जूनच्या अखेरीस आणि ऑगस्टच्या सुरुवातीला इंग्लंड आणि भारताचा कसोटी दौरा संपेल तेव्हा हे घडण्याची शक्यता आहे. ते नंतरच्या वेळी देखील आयोजित केले जाऊ शकते. आयपीएलमध्ये अजूनही १६ सामने शिल्लक आहेत. आता बीसीसीआय या सामन्यांचे वेळापत्रक कधी जाहीर करते हे पाहणे बाकी आहे.
हेही वाचा – IPL 2025 पुढे ढकलल्याने बीसीसीआय आणि फ्रँचायझींचे तब्बल ‘इतक्या’ कोटींचे नुकसान
आता आशिया कपचे आयोजनही अनिश्चित –
सुरक्षा व्यवस्था ही बीसीसीआयसाठी देखील एक मोठी चिंता आहे. सध्याच्या परिस्थितीत, केंद्रीय सुरक्षा दलांची उपलब्धता मर्यादित आहे, ज्यामुळे स्थळांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या संकटामुळे केवळ आयपीएलच नाही तर सप्टेंबरमध्ये होणारा आशिया कपही धोक्यात आला आहे. भारत या स्पर्धेचे आयोजन करणार आहे, परंतु सध्याच्या परिस्थितीत त्याचे आयोजन देखील अनिश्चित दिसते.





