#RogerBinny | बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी सुनेमुळे अडचणीत

मुंबई – बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी ( Roger Binny ) प्रसिद्ध अँकर व सून मयंती लॅंगरमुळे अडचणीत सापडले आहेत. मयंती स्टार माविहीची अँकर असल्याने व याच कंपनीकडे भारताच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपणाचे हक्क असल्याने बिन्नी यांच्याविरुद्ध बीसीसीआयचे नीतिशास्त्र अधिकारी विनीत सरन यांच्याकडे संजीव गुप्ता यांनी आर्थिक हितसंबंधांची तक्रार दाखल केली आहे. त्यांना याला उत्तर देण्यासाठी 20 डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
#VijayHazareTrophy । ऋतुराज पुन्हा चमकला! आसामवर मात करत महाराष्ट्र अंतिम फेरीत
संजीव गुप्ता यांनी केलेल्या तक्रारीनुसार विनीत सरन यांनी बिन्नी ( Roger Binny ) यांना नोटीस पाठवली असून बिन्नी यांची सून मयंती स्टार स्पोर्टसाठी काम करतात. स्टार स्पोर्टकडे भारतीय क्रिकेट संघाच्या सामन्यांचे हक्क आहेत. त्यामुळे सरन यांनी बिन्नी यांना कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टची (आर्थिक हितसंबंध) नोटीस पाठवली आहे.
#VijayHazareTrophy । ऋतुराज पुन्हा चमकला! आसामवर मात करत महाराष्ट्र अंतिम फेरीत
बीसीसीआय नियम 39(2)(बी) नुसार नियमाचे उल्लंघन करण्यात आल्याचे या नोटिसीत नमूद करण्यात आले आहे. बिन्नी ( Roger Binny ) यांची ऑक्टोबर महिन्यात बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली होती. माजी कर्णधार सौरभ गांगुली यांच्या जागी बिन्नी यांची नियुक्ती करण्यात आली होती. मयंती या रॉजर बिन्नी यांच्या सून आहेत. स्टुअर्ट बिन्नी व मयंती यांचा 2012 साली विवाह झाला होता. सध्या मयंती स्टार स्पोर्टसाठी अँकर म्हणून काम करतात.


