PBKS vs DC : पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर BCCI खेळाडूंना विशेष ट्रेनने सुरक्षित ठिकाणी पोहोचवणार

BCCI will arrange a special train to evacuate IPL 2025 players : पाकिस्तान हल्ल्यांदरम्यान बीसीसीआय उद्या आयपीएल २०२५ बाबत बैठक घेणार आहे. वृत्तानुसार, या काळात आयपीएलबाबत निर्णय घेतला जाईल. त्याच वेळी, बीसीसीआय खेळाडूंना धर्मशाला येथून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेनची व्यवस्था करत आहे. या ट्रेनने सपोर्ट स्टाफ आणि ब्रॉडकास्ट टीमलाही बाहेर काढले जाईल. गुरुवारी पाकिस्तानने काही शहरांवर हल्ला केला.
यानंतर, धर्मशाला येथे खेळला जाणारा पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करण्यात आला. या सामन्यात अगोदर वीजपुरवठा खंडित झाला आणि हळूहळू संपूर्ण मैदान अंधारमय झाले. यानंतर, आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमल मैदानावर प्रेक्षकांना मैदान रिकामे करण्याचे आवाहन करताना दिसले. यानंतर काही वेळातच मैदानात उपस्थित असलेले सर्व खेळाडू, प्रेक्षक आणि इतरांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.
🚨 CALL ON IPL 2025 WILL BE TAKEN TOMORROW BY THE BCCI. 🚨
– The BCCI will arrange a special train to evacuate players, support staff and broadcast crew. (Sahil Malhotra). pic.twitter.com/MCCOikDFja
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 8, 2025
बीसीसीआय खेळाडूंसाठी विशेष ट्रेन चालवणार –
आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंच्या सुरक्षेची जबाबदारी बीसीसीआय विशेष काळजी घेईल. खेळाडूंसाठी विशेष गाड्यांची व्यवस्था केली जाईल, ज्याच्या मदतीने त्यांना सुरक्षित ठिकाणी नेले जाईल. बीसीसीआयचे उपाध्यक्ष म्हणाले, “सर्वांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी आम्ही विशेष गाड्यांची व्यवस्था करत आहोत. सध्या सामना रद्द करण्यात आला आहे आणि स्टेडियम रिकामे करण्यात आले आहे. परिस्थितीनुसार आम्ही उद्या स्पर्धेच्या भविष्याबाबत निर्णय घेऊ. सध्या खेळाडूंची सुरक्षा आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे.”
हेही वाचा – Virat Anushka Video : विराट-अनुष्काच्या नात्यात कटुता? व्हायरल VIDEO ने चर्चेला उधाण
सामना अचानक थांबला –
IPL Governing Council chairman Arun Dhumal is seen requesting people to leave the stadium after the Punjab Kings vs Delhi Capitals match was called off in Dharamsala.
📹: @rvmoorthyhindu #IPL2025 | #PBKSvsDC pic.twitter.com/BH9jmZaYHC
— Sportstar (@sportstarweb) May 8, 2025
धर्मशाला येथील मैदानावर पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जाणारा सामना अचानक थांबवण्यात आला. सामन्यात फक्त १०.१ षटके खेळली गेली होती, तेव्हा फ्लडलाइट्स एकामागून एक बंद करण्यात आले. लवकरच सर्व खेळाडू मैदानाबाहेर पडले आणि ड्रेसिंग रूममध्ये परतू लागले. यानंतर, आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमल स्वतः मैदानावर आले आणि त्यांनी सर्व प्रेक्षकांना मैदान रिकामे करण्याचे आवाहन केले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.





