भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) मधून जय शहा पदावरून हटल्यानंतर रिक्त झालेले सचिवपद सध्या भरण्यात आले आहे. गेली 5 वर्षे बीसीसीआयचे सचिव असलेले जय शाह यांनी नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. जय शहा बीसीसीआय सोडून आयसीसीमध्ये दाखल झाल्यामुळे सचिवपद रिक्त झाले होते, ज्याची आता नियुक्ती करण्यात आली आहे.
भारतीय क्रिकेट बोर्ड अर्थात बीसीसीआयचे सहसचिव देवजीत सैकिया यांना अंतरिम सचिवपदी बढती देण्यात आली आहे. त्यामुळे, ते आता जय शहा यांची जागा घेतील, ज्यांनी 1 डिसेंबर रोजी आयसीसी चेअरमन म्हणून पदभार स्वीकारला आहे.
ACA extends its warmest congratulations to Devajit Saikia, BCCI Joint Secretary, on assuming charge as a Board Director, ICC, representing the BCCI.
This remarkable achievement is a reflection of his unwavering passion for cricket and…
1/3 pic.twitter.com/rRFBsu8wKd
— Assam Cricket Association (@assamcric) December 7, 2024
सैकिया हे वकील असून ते आसामकडून देशांतर्गत क्रिकेट खेळले आहेत, जिथे त्यांनी यष्टिरक्षक-फलंदाजाची भूमिका बजावली. तसेच बीसीसीआयमध्ये येण्यापूर्वी ते आसाम क्रिकेट असोसिएशनमध्ये सचिव म्हणूनही कार्यरत होते.
पीटीआयच्या वृत्तानुसार, सैकिया हे कायमस्वरूपी सचिव बनलेले नाहीत. या पदासाठी निवडणूक होणे बाकी आहे, तथापि सैकिया सप्टेंबरपर्यंत सचिवपदी राहू शकतात. या आठवड्यात दुबईत आयसीसीची बैठक झाली, ज्यामध्ये सैकियांनी बीसीसीआयचे प्रतिनिधित्व केले होते. यापूर्वी ते मंडळात सहसचिव होते.