India A Squad : इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर! ‘या’ खेळाडूकडे सोपवली कर्णधारपदाची धुरा

BCCI Announces India A Squad for England Tour : बीसीसीआयने इंग्लंड दौऱ्यासाठी भारत अ संघाची घोषणा केली आहे. अभिमन्यू ईश्वरनला या संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. तर उपकर्णधारपदाची जबाबदारी ध्रुव जुरेलकडे देण्यात आली आहे. या संघात इशान किशन आणि शार्दुल ठाकूर यांचेही पुनरागमन झाले आहे. त्याशिवाय, हर्ष दुबेचाही पहिल्यांदाच भारत अ संघात समावेश करण्यात आला आहे.
दुसऱ्या सामन्यात शुबमन गिल आणि साई सुदर्शन या संघात सामील होतील. भारत अ संघ इंग्लंड लायन्सविरुद्ध दोन अनधिकृत कसोटी सामने खेळणार आहे. त्यानंतर भारताच्या वरिष्ठ संघासोबत एक इन्ट्रा-स्कॉड सामना खेळला जाईल. ज्यासाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे. त्यात अशा अनेक खेळाडूंचाही समावेश करण्यात आला आहे, जे भारताच्या वरिष्ठ संघाकडूनही खेळतील.
भारत अ संघाचा सामना ३० मे पासून सुरू होईल.
🚨 𝗡𝗘𝗪𝗦 🚨
India A’s squad for tour of England announced.
All The Details 🔽
— BCCI (@BCCI) May 16, 2025
यावेळी बीसीसीआयने कार्यक्रमाची घोषणाही केली आहे. पहिला सामना ३० मे रोजी कॅन्टरबरी येथे खेळला जाईल. हा सामना ३० मे ते २ जून दरम्यान खेळला जाईल. दुसरा सामना ६ जून ते ९ जून दरम्यान नॉर्थम्प्टन येथे खेळला जाईल. यानंतर, भारत अ संघ भारतीय संघासोबत एक इन्ट्रा-स्कॉड सामना खेळेल. हा सामना १३ जून ते १६ जून दरम्यान बेकेनहॅम येथे खेळला जाईल.
हेही वाचा – Rohit Shrama : ‘जर मी कोच असतो, तर…’, रोहितच्या निवृत्तीवरून रवी शास्त्रींनी गौतम गंभीरवर साधला निशाणा
इंग्लंड दौऱ्यासाठी भारत अ संघ:
अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, करुण नायर, ध्रुव जुरेल (उपकर्णधार) (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, शार्दुल ठाकूर, इशान किशन (यष्टीरक्षक), मानव सुथार, तनुष कोटियन, मुकेश कुमार, आकाश दीप, हर्षित राणा, अंशुल कंबोज, खलील अहमद, ऋतुराज गायकवाड, सर्फराझ खान, तुषार देशपांडे, हर्ष दुबे





