India vs Japan : बीसीसीआयची ऐतिहासिक घोषणा! क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच टीम इंडिया ‘या’ देशाशी खेळणार सामना
India vs Japan : आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ च्या आधी भारतीय पुरुष क्रिकेट संघ जपानविरुद्ध एक आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळणार आहे.

India vs Japan Historic T20I Match BCCI JCA Diplomatic Ties Asian Games 2026 : बीसीसीआयने शुक्रवारी ४ सप्टेंबर रोजी एका ऐतिहासिक सामन्याची अधिकृत घोषणा करून क्रीडा जगताला सुखद धक्का दिला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ च्या आधी भारतीय पुरुष क्रिकेट संघ जपानविरुद्ध एक आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळणार आहे. भारत आणि जपान यांच्यातील पुरुष आंतरराष्ट्रीय क्रिकेट इतिहासातील हा पहिलाच सामना ठरणार आहे. दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांच्या ७५व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून या ऐतिहासिक सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे.
२२ सप्टेंबरला सानो आंतरराष्ट्रीय मैदानावर महामुकाबला!
बीसीसीआयने अधिकृत निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, हा ऐतिहासिक सामना मंगळवारी २२ सप्टेंबर रोजी जपानमधील तोचिगी येथील ‘सानो इंटरनॅशनल क्रिकेट ग्राउंड’वर रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी ९:३० वाजता सामन्याला सुरुवात होईल. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा पहिला सामना २८ सप्टेंबरला होणार असून, त्याआधी ६ दिवस भारतीय संघ या खास सामन्यात उतरणार आहे.
भारत-जपान मैत्रीची ७५ वर्षे; ऑलिम्पिक २०३६ च्या दिशेने मोठे पाऊल –
𝗛𝗶𝘀𝘁𝗼𝗿𝘆 𝗜𝗻 𝗧𝗵𝗲 𝗠𝗮𝗸𝗶𝗻𝗴!
India🇮🇳 🤝 Japan🇯🇵#TeamIndia set to play a historic T20I against Japan to launch the celebrations of the 7️⃣5️⃣th Anniversary of India-Japan Diplomatic Relations. 👏👏@CricketJapan
All The Details 🔽https://t.co/vxdhuT1tgp pic.twitter.com/DQmPncvefH
— BCCI (@BCCI) September 4, 2026
हा सामना “स्पोर्ट ७५” (Sport 75) या विशेष उपक्रमाचा भाग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानच्या पंतप्रधानांमधील शिखर परिषदेत झालेल्या सामंजस्य करारातून हा उपक्रम साकारला आहे. भारताचे २०२६ ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक यजमानपदाचे स्वप्न लक्षात घेता, दोन्ही देशांमधील क्रीडा क्षेत्रातील संबंध अधिक दृढ करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी या सामन्याला पूर्व आशियात क्रिकेटचा विस्तार करणारा ऐतिहासिक क्षण म्हटले आहे.
“विश्वविजेत्यांना जपानमध्ये बोलावणे अभिमानास्पद”; JCA कडून आनंद व्यक्त –
जपान क्रिकेट असोसिएशनचे (JCA) मुख्य कार्यकारी अधिकारी नाओकी मियाजी यांनी बीसीसीआयचे आभार मानले. “सध्याच्या जगज्जेत्या भारतीय संघाचे जपानमध्ये स्वागत करणे हा आमच्यासाठी अत्यंत गौरवाचा आणि ऐतिहासिक क्षण आहे. हा सामना जपानमध्ये क्रिकेटच्या प्रसारासाठी मैलाचा दगड ठरेल,” अशा शब्दांत त्यांनी आनंद व्यक्त केला. आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी भारतीय संघाची ही नवी रणनीती चाहत्यांसाठी अत्यंत रंजक ठरणार आहे.





