रशियाः सीरियाचे पदच्युत राष्ट्राध्यक्ष बशर अल असद पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. रशियात कुटुंबासह राहणाऱ्या बशर यांना विष देऊन ठार मारण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे बोलले जात आहे. असा दावा एका रशियन गुप्तहेराच्या टेलिग्राम चॅनेलने केला आहे. या दाव्यामुळे रशियात मोठी खळबळ उडाली आहे. असद हे त्यांच्या कुटुंबासोबत रशियात निर्वासित म्हणून राहत आहेत. या गुप्तहेर टेलिग्राम चॅनेलने केलेल्या दाव्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. माजी गुप्तहेरने कोणते खळबळजनक दावे केले? टेलिग्राम चॅनल जनरल एसव्हीआरवर प्रसिद्ध झालेल्या अहवालात रविवारी असद यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचा दावा करण्यात आला होता. याबाबत असद यांनी अस्वस्थ वाटू लागल्याचे डॅाक्टरांना सांगितलेव होते. यानंतर डॉक्टरांच्या पथकाने त्यांच्यावर उपचार सुरू केले. मात्र, त्यांची प्रकृती अधिकच खालावली आणि त्यांना सतत खोकला येऊ लागला होता. तसेत त्यांना गुदमरल्यासारखे देखील वाटत होते, असे अहवालात म्हटले आहे. असद यांना तीव्र स्वरुपाची डोकेदुखी सुरू झाली. त्यानंतर पोटात देखील वेदाना होऊ लागल्या. याबाबतची माहिती व्लादिमीर पुतीन यांच्या कार्यालयाला देण्यात आली. मात्र, पुतीन यांच्या कार्यालयाने त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात याव्यात अशा सूचना दिला. यानंतर असदची यांच्या रक्ताची तपासणी करण्यात आली. या तपासणीत एक धक्कादायक माहिती समोर आली. असद यांच्या शरीरात विषारी घटक आढळून आले आहेत. मात्र, त्यांच्या शरीरात हे विषू कसे गेले याचे कारण अद्यापर्यंत समजू शकलेले नाही. असर यांना विषबाधा झाल्याचे वृत्त रशियन कार्यालयाने फेटाळून लावले आहे. तसेच बशर-अल-असद यांना विषबाधा झाल्याची बातमी अटकळ स्वरुपाची असल्याचे त्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे. असद यांना विषबाधा झाली तेव्हा रशियाने काय म्हटले? असद यांना विषबाधा झाली असल्याच्या बातम्या काही माध्यमांनी दिल्या आहेत. ब्रिटीश वेबसाइट द सनने, रशियामध्ये बशर अल-असदला विषबाधा झाल्याच्या बातमी दिली. त्यानुसार असद यांची प्रकृती रविवारी खालावली होती, त्यानंतर त्यांना वैद्यकीय मदत देण्यात आल. असे म्हटले आहे. द सन या वेबसाईटच्या सूत्रांनी त्यांना दिलेल्या माहितीनुसार, असद यांचा हत्येचा प्रयत्न झाला असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांच्याच अपार्टमेंटमध्ये असद यांच्यावर उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. त्याच्या रक्ताची चाचणी अहवालात त्यांना विषबाधा झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पुतिनबद्दल काय दावे केले जात आहेत? बशर-अल-असद यांना विषबाधा झाल्याच्या बातम्यांवरून रशियात पुतिन यांची कोंडी केली जात आहे. रशियात आश्रय घेतल्यानंतर असद यांचे पुतीनशी असलेले संबंध आता इतके सौहार्दपूर्ण राहिले नाहीत, असे अनेक अहवाल सांगतात. असद हे पुतिन यांच्यासाठी अडचणीचे ठरत असल्याचा देखील दावा एका अहवालात करण्यात आला होता. असद यांना विषबाधा प्रकारावर एका अहवालात म्हटले आहे की, पुतिन यांचा विरोधकांना गप्प करण्याचा इतिहास आहे. असद ८ डिसेंबरपासून रशियात असद आणि त्याचे कुटुंब 8 डिसेंबरपासून रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये राहत आहेत. हयात तहरीर अल-शामच्या नेतृत्वाखालील बंडखोरांनी सीरिया ताब्यात घेतल्यानंतर, असद आपल्या कुटुंबासह देश सोडून रशियात आले.