बारामतीकर हादरले! एका दिवसात करोनाचे 80 रुग्ण; प्रशासनाने केले ‘हे’ आवाहन

बारामती (प्रतिनिधी) : बारामती शहर व तालुक्यात करोनाचे प्रादुर्भाव वाढत असून काल दिवसभरात 80 जणांना करोनाची बाधा झाली असल्याचे तपासणी अहवालात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बारामतीकरांची चिंता वाढली आहे. प्रशासनाकडून करोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र करोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
काल दिवसभरात बारामती शहर व तालुक्यातील शासकीय व खासगी प्रयोगशाळेत 397 जणांची नमुने तपासण्यात आले. त्यामध्ये 80 जण करोना संक्रमित रुग्ण असल्याचे आढळून आले आहे.
शहरात 54 तर तालुक्यात 24 रुग्ण आढळून आले आहेत. एकूण रुग्ण संख्या 7214 वर पोहोचली आहे. त्यापैकी सहा हजार 6,638 रुग्ण आत्तापर्यंत बरे झाले आहेत.
शासकीय नियमांचे नागरिकांकडून उल्लंघन होत असल्याने करोनाचा प्रसार पुन्हा वेगाने वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे.





