बारामती: भाजपा युवा मोर्चा पुणे जिल्हा अध्यक्षपदी वैभव सोलनकर यांची नियुक्ती

बारामती – भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हा अध्यक्षपदी वैभव सोलनकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बारामतीमध्ये भाजपच्या नव्या नेतृत्वाला व ताकदीला जोरदार चालना देण्यासाठी संघ परिवारातील हा एक अत्यंत विश्वासू आणि अनुभवी कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो. संघटनेच्या मुळाशी काम करून त्यांनी आपल्या नेतृत्वगुणांचा व कार्यक्षमतेचा ठसा उमटवला आहे.
सोलनकर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार राहुल कुल, आमदार योगेश टिळेकर, माजी आमदार राम सातपुते आणि महामंत्री राजेश पांडे, जिल्हा अध्यक्ष शेखर वडणे यांचा विश्वासू म्हणून राज्यभर ओळख आहे.
वैभव सोलनकर यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात अभाविप महाविद्यालय अध्यक्षपदापासून केली. त्यांनी अभाविप कॉलेज अध्यक्ष, बारामती शहर मंत्री, अभाविप जिल्हा संयोजक, अभाविप प्रदेश कार्यसमिती सदस्य अशा विविध महत्वाच्या पदांवर काम केले आहे. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विस्तारक म्हणून मुळशी येथे मोठ्या प्रमाणावर काम केलं आहे. तसेच मुंबई येथे पूर्ण वेळ काम, दिल्ली येथे विद्यार्थी निवडणुकीसाठी केलेले योगदान हे त्यांच्या कामाच्या प्रामाणिकपणाचं द्योतक आहे.
युवा मोर्चा मध्येही त्यांनी जिल्हा सरचिटणीस म्हणून दोन वेळा काम केलं आहे. या अनुभवाचा आणि संघटनेतील दीर्घकालीन कार्याचा विचार करता त्यांना युवा मोर्चा पुणे जिल्हा अध्यक्ष म्हणून निवडले गेले आहे. बारामतीसह संपूर्ण पुणे जिल्ह्यात भाजपला नव्या उंचीवर नेण्याचा आणि युवकांमध्ये भाजपची ताकद मजबूत करण्याचा वैभव सोलनकर यांचा निर्धार आहे.
भाजपच्या संघटनेतील या विश्वसनीय आणि कष्टाळू कार्यकर्त्याच्या नेतृत्वाखाली बारामतीत नवा उत्साह आणि नवीन ऊर्जा निर्माण होणार आहे. हा निर्णय भाजपच्या युवा मोर्चाच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असून पार्टीला आगामी काळात नव्या यशस्वी टप्प्यांवर नेईल याची अपेक्षा आहे.





