Baramati News : ऑनलाइन रमीच्या नादात चक्क शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारांची झाली चोरी
Updated On:

बारामती : ऑनलाइन रमीच्या नादात बारामतीतील जिरायत पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या मुलांनी चोरीचा मार्ग स्वीकारला असल्याचं दिसून येत आहे. परिसरातील शेतकऱ्यांच्या तब्बल वीस विद्युत मोटारांची केली चोरी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी धडक कारवाई केली असून, ६ आरोपींना अटक करत ३ लाख १६ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी ही माहिती दिली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे उपस्थित होते.





