Baramati Election Result: मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज; देशपांडे विद्यालयात आज उघडणार उमेदवारांचे नशीब

प्रभात वृत्तसेवा
बारामती – बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी (दि.२१) सकाळी दहापासून म.ए.सो चे ग. मि देशपांडे विद्यालय सभागृह, भिगवण रोड, बारामती येथे करण्यात येणार असून मतमोजणीच्या वेळी केवळ उमेदवार व त्यांचे निवडणूक प्रतिनिधी तसेच मतमोजणी प्रतिनिधी यांना अधिकृत ओळखपत्राच्या आधारेच प्रवेश असणार आहे. मतमोजणीसाठी एकूण २० टेबल्स असून अध्यक्षपदासाठी मतमोजणी ही सर्व २० टेबलवर होणार आहे.
ठिकाणी १५५ मतमोजणी अधिकारी, कर्मचारी व पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.१ ते २० टेबलवर होणार असून १ ते २० प्रभागाची मतमोजणी ही त्या त्या प्रभागातील मतदान केंद्राच्या संख्येप्रमाणे त्या त्या टेबलवर सोबत दिलेला तक्त्याप्रमाणे होणार असून सर्व प्रथम पोस्टल मतपत्रिकांची मोजणी १० वाजता सुरु होईल. त्यानंतर इव्हीएमची मतमोजणी सुरु होईल.
मतमोजणीच्या ठिकाणी उमेदवार अथवा मतमोजणी प्रतिनिधी यांना मोबाइल बाळगण्यास सक्त मनाई आहे याची नोंद घ्यावी. मतमोजणीच्या ठिकाणी स्वतंत्र पत्रकार कक्षाची स्थापना केलेली आहे. फक्त पत्रकार कक्षात मोबाइल वापरण्यास परवानगी राहील. मत्तमोजणी केंद्रावर अधिकृत ओळखपत्र असणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना प्रवेश देण्यात येणार आहे. त्या व्यतीरिक्त अन्य कोणासही प्रवेश देण्यात येणार नाही नसल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.





